Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2025: पहिल्या माळेचा रंग पांढरा, शांतता-समृद्धीचं प्रतिनिधित्व करणारी शितळादेवीचं काय आहे महत्त्व?

माहिमची शितळादेवी ही प्रामुख्याने कोळी समजाची देवता आहे. पालघर,ठाणे आणि मुंबई भागातील कोळी समाज या देवीला खूप जास्त मानतो. शितळादेवी ही पावित्र्य़ाचं शांततेचं प्रतीक आहे. शितळा म्हणजे तिचा स्वभाव शितल शांत आहे अशी ही देवी

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 22, 2025 | 07:25 PM
Navratri 2025: पहिल्या माळेचा रंग पांढरा, शांतता-समृद्धीचं प्रतिनिधित्व करणारी शितळादेवीचं काय आहे महत्त्व?
Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे स्त्रीशक्तीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. आदीमाया जगदंबेची नऊ वेगवेगळी रुपं आणि त्या रुपांच प्रतिनिधत्व करणारे रंग देखील आहेत. यंदाच्या पहिल्याच दिवशी पहिल्या माळेचा रंग आहे म्हणजे पांढरा. हा पांढरा रंग प्रतिनिधित्व करतो ते म्हणजे देवी शितळामातेचं. या पांढऱ्या रंगाचं नेमकं काय महत्व आहे ते शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने  जाणून घेऊयात.

माहिमची शितळादेवी ही प्रामुख्याने कोळी समजाची देवता आहे. पालघर,ठाणे आणि मुंबई भागातील कोळी समाज या देवीला खूप जास्त मानतो. शितळादेवी ही पावित्र्य़ाचं शांततेचं प्रतीक आहे. शितळा म्हणजे तिचा स्वभाव शितल शांत आहे अशी ही देवी.

देवी माता म्हटली की पहिले आठवतं ते दुर्गेचा रौद्र अवतार. शितळादेवी मात्र याच्या विरुद्ध आहे. खरंतर प्रत्येक देवीचं रुप हे स्त्रीजीवनाशी जोडलेलं आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दोन हात करणारी दुर्गा जशी आहे तशी कुटुंबासाठी प्रेम, आनंद आणि स्नेह जपणारी स्त्री तितकीच सात्विक आणि शांत आहे. शितळादेवी अशा स्त्रीस्वभावाचं रुप आहे.

Shardiya Navratri 2025: भक्ताने घातली शपथ अन्… ; आई तुळजा भवानीच्या तुळजापूरातील मंदिराची ‘अशी’ आहे आख्यायिका

अडीचशे ते तीनशे वर्षांचा इतिहास

माहिमच्या या देवीचं मंदिर अडीचशे ते तीनशे वर्ष जुनं आहे. १८९० ते १८९५ या काळात मुंबईच्या कोळी बांधवांनी उभारले आहे. हे मंदिर सुरुवातीला मुंबईच्या किनाऱ्यालगत होते, पण नंतर कोळी बांधवांनी ते माहीमच्या पश्चिम भागात हलवले. हे कोळी बांधवांचे कुलदैवत मानले जाते आणि आख्यायिकांनुसार राजा बिंबदेव यांनी १३ व्या शतकात केळवे येथून देवीला माहीम येथे आणलं असं सांगितलं जातं. ही देवी पांढरं वस्त्र परिधान करते. पांढऱ्या रंगाची साडी, चांदीचे पैजण, चांदीच्या बांगड्या, पुजेला पांढरी फुलं असं एकंदरीत देवीचं सोवळं असतं.

रोगांचा नाश करणारी देवी

पांढरा रंग हा पावित्र्य, शांती आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. देवी शितळा ही मोठे आजार आणि रोगांचा नाश करणारी देवता असल्याने, तिच्या स्वरूपात पांढऱ्या रंगाचा वापर हा शुद्धतेचा संदेश देतो. माहिम भागातील कोळी बांधवांचा असा समज आहे ही शितळादेवीच्या दर्शनाला आलेल्या भक्ताचे आजार दूर होतात. पुर्वीच्या काळी लहान मुलांना कांजण्या, गोवर किंवा कावीळची बाधा झाली की, शितळादेवीच्या मंदिरात आणलं जात असे. असं म्हटलं जातं की, स्कंदपुराणानुसार, एका अग्नीकुंडातून शितळा देवीची निर्मिती झाली. शांतता आणि समृद्धीसाठी या देवीला ओळखलं जातं.

नवरात्रीत देवीचा मोठा उत्सव असतो. लाखो संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात मात्र एवढं असूनही कोणत्याही भक्ताला धक्काबुक्की आजपर्यंत झाली नाही. शितळादेवी शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे. या देवीला भक्त कोळी समाजच नाही तर वाडवळ समाज, गौड-सरस्वत ब्राह्मण समाज देखील या देवीची मनोभावे पूजा करतात.

 

Shardiya Navratri 2025: नवरात्रीत नऊ धान्य पेरण्याचं शास्त्र काय? काय आहे याचा अर्थ ?

 

 

 

 

Web Title: Navratri 2025 navratri 2025 the color of the first garland is white representing shitlamata peace and prosperity what is the significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Navratri
  • Navratri 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.