यंदा शारदीय नवरात्रीला सुरुवात 22 तारखेपासून होत आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. महाराष्ट्रात आई तुळजाभवानी आणि अंबाबाई यांना आद्य देवता मानलं जातं. महाराष्ट्रातील अनेक कुळांची कुलस्वामिनी ही आई तुळजाभवानी आहे. याच तुळजाभवानीच्या तुळजापुरातील वास्तव्याची आख्यायिका आज जाणून घेऊयात.
हिंदू धर्मातील तुळजापुरची आई तुळजाभवानीचं अत्यंत जागृत असं देवस्थान आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी डोकं टेकवण्यासाठी येत असतात. पण तुम्हाला माहितेय का आई तुळजाभवानीच्या प्रकटीकरणाची देखील एक रंजककथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की, कर्दम ऋषी हे देवी भगवतीने मोठे भक्त होते. एके दिवशी कर्दम ऋषी देह त्याग केला. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही देखील सती जात होती. तिला आश्रमातील अनेकांनी समजावून सांगितलं की, देवी आपण सती जाऊ नका आपल्याला एक लहान मुलगा आहे तसंच आपल्या पोटात देखील एक जीव वाढत आहे. या दोन्ही जीवांना मारण्याचं पाप आपण आपल्य़ा माथी घेऊ नये. अनुभूती आपला पत्नीधर्म निभावताना आपण मातृत्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना हा विचार मनात येताच तिने सती न जाण्याचा निर्णय घेतला.
कर्दम ऋषी म्हणजेच आपले पती भगवती देवीची आराधना करत असे याचमुळे मनोरमादेखील गर्भवती असताना भगवती देवीची आराधना करत ध्यानस्थ जंगलात बसली होेती. त्यावेळी एका असूराने तिची तपश्चर्या भंग केली आणि तिच्या अंगावर हात टाकण्यातचा प्रयत्न केला त्यानंतर अनुभूतीने भगवती देवीचा धावा केला. त्यावेळी भगवती देवी त्याठिकाणी प्रकट झाली. अनुभूतीचं पावित्र्य भंग करु पाहणाऱ्या असूराचा तिने नाश केला. भगवती देवीचं रौद्ररुप होतं. देवीच्या डोळ्यात अंगार होता. त्या असूराबाबातचा क्रोध तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता त्याचवेळी तिच्या हृदयात अनुभूतीच्या प्रेमाचा पाझर देखील होता. असूराचा वध केल्यानंतर भगवती देवीने आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते जवळ घेते अगदी त्याच मायेने अनुभूतीला जवळ घेतलं.
देवीने अनुभूतीला सांगितलं की प्रत्येक भक्त देवीचं बाळ आहे आणि आई कधीच आपल्या लेकरांना संकटात सोडत नाही. मी संकटात तुमच्या हाकेला धावून येईलच पण कधीही कोणत्याही भयाण परिस्थितीसमोर न झुकता ठामपणे संकटांचा प्रतिकार करता यायला हवं प्रत्येकाला. मी सैदेव तुझं रक्षण करेन, देवीचं हे बोलणं ऐकून अनुभूती भारावून गेली. तिने देवीला शपथ घातली की, तू आजपासून या ठिकाणी वास्तव्यास राहणार आहे. तुझ्या कृपेची आणि मायेची गरज प्रत्येक भक्ताला आहे. आपल्या भक्ताने घातलेली शपथ देवीला मोडता आली नाही आणि तिने त्याच ठिकाणी वास्तव्य केलं ते ही कायमच. जे आज तुळजापूर या नावाने प्रसिद्ध आहे. देवी भगवती हे तुळजाईचं दुसरं नाव आहे. अशी आहे देवी तुळजाईच्या तुळजापुरातील वास्तव्याची आख्यायिका.