
Significance of Navratri Nights (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपण दिवसभर काम करतो, धावपळ करतो आणि रात्री शांत झोपतो. झोपल्यानंतर सकाळी आपण फ्रेश होतो. नवरात्र पण तशीच आहे. ती आपल्या आत्म्याला विश्रांती देणारी आहे.खरं सांगायचं तर नवरात्रीत खरी शक्ती रात्रीच जागी होते. शास्त्रात सांगितलं आहे की, रात्रीच्या वेळीच ब्रह्मांडाची ऊर्जा सगळ्यात जास्त पॉवरफुल असते. यावेळी देवीची शक्ती पृथ्वीवर जास्त असते. त्यामुळे दिवसा केलेल्या पूजेपेक्षा रात्री केलेली पूजा, जप, ध्यान जास्त लवकर लागते. साधकाला थेट देवीशी कनेक्शन लागतं. म्हणूनच तर नवरात्रीत रात्री गरबा, जागरण, मंत्रपठण करतात.
रात्र म्हणजे फक्त अंधार नसून आराम आहे. दिवसभराच्या दगदगीनंतर रात्री शातंता मिळते. अध्यात्मात रात्रीचा अर्थ अजून खोले सांगितला आहे. ऑफिस, मोबाईल, लोकं यामध्ये आपलं मन बाहेर भटकत असतं. मात्र रात्री शांतंता असल्याने आपण स्वत:मध्ये डोकावतो. हीच खरी साधना आहे. शांततेत बसून मंत्र म्हणणे, ध्यान करणे हे रात्रीच जास्त चांगलं होतं. म्हणून रात्रीच्या साधनेला सगळ्यात वरचा मान दिला आहे.
Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या व्रताचे खास नियम
या नऊरात्री सामान्य रात्री नसतात. या काळात वातावरणात एक वेगळीच ऊर्जा फिरत असते. देवीची स्त्री ऊर्जा खूप जास्त सक्रिय असते. दिवसा सूर्याची ऊर्जा खूप स्ट्रॉंग असते. रात्री सूर्य नसतो म्हणून वातावरण सात्विक होतं, शांत होतं. हीच वेळ साधकासाठी बेस्ट असते. या शांततेत देवीची ऊर्जा लवकर आपल्यात येते.
म्हणूनच तर मोठमोठे तांत्रिक, साधू लोक पूर्ण वर्ष या नऊ रात्रींची वाट बघतात. याकाळात केलेली कोणतीही साधना, मंत्र सिद्धी याचं फळ १०० पटीने जास्त मिळतं असं मानतात. रात्रीची शांतता आणि एकांत गुप्त साधनेसाठी एकदम परफेक्ट असतो.
नवरात्र आपल्याला एक गोष्ट शिकवते. खरी शक्ती बाहेरच्या गोंधळात नाही, तर आपल्या आतल्या शांततेत आहे. दिवसभर आपण बाहेर शोधतो, पण रात्री जेव्हा शांत बसतो तेव्हा देवी आत सापडते.या नऊ रात्री जर मनापासून पूजा केली, ध्यान केलं, तर माणसाची आध्यात्मिक प्रगती खूप वेगाने होते. मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि देवीची कृपा मिळते यालाच नऊ दिवस नाही, तर नवरात्र म्हणतात. कारण हा खेळ रात्रीचा आहे, विश्रांतीचा आहे आणि स्वतःला पुन्हा नव्याने शोधण्याचा आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)