फोटो सौजन्य- pinterest
आजचा 14 ऑगस्टचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. मूलांक 5 चे स्वामी ग्रह बुध आहेत. त्यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर त्यांचा प्रभाव राहील. तर आजचा गुरुवारचा दिवस असल्याने आजचा स्वामी ग्रह गुरू आहे. गुरुचा अंक 3 मानला जातो. त्यामुळे या लोकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. तर मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही दीर्घकाळापासून ज्या तणावाखाली होतात ते दूर होईल. व्यवसायात नवीन कामाची सुरुवात करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि समाजात मन सन्मान वाढेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये आर्थिक फायदा होऊ शकतो त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्यामध्ये चढ उतार राहू शकतो. त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहाल. आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास डॉक्टराचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी वादविवाद करणे टाळा. घाई केल्यास तुम्हाला नुकसान होईल.
मूलांक 3 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे तुमचे काही काम सोपे होईल. एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केल्याने मानसिक ताण येऊ शकतो. व्यवसायात कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रकल्पामध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. तुमची काही काम लवकर पूर्ण होऊ शकतात. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक फायदा होऊ शकतो.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. मानसिक तणाव वाढू शकतो. कामानिमित्त तुम्हाला बाहेर प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायामध्ये काही नवीन योजना आखू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. महत्त्वाच्या कामात अडथळ्यांचा सामना करावा लागू लागू शकतो. व्यवसायात सतर्क रहावे. नोकरी करणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस जास्त चांगला राहणार नाही. रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)