फोटो सौजन्य- pinterest
आपल्या इतिहासातील सर्वात खास दिवस म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन. जवळजवळ 200 वर्षे ब्रिटिशांच्या राजवटीत राहिल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत अखेर स्वतंत्र झाला. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. या वेळी देशभर ध्वजारोहण, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच आपल्या मनात देशभक्ती आणि एकतेची भावना देखील बळकट होते.
यापूर्वी ब्रिटीश सरकारने 30 जून 1948 हा दिवस भारत स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, 1947 मध्ये देशाच्या फाळणी, राजकीय संघर्ष आणि जातीय हिंसाचाराच्या धोक्यामुळे तणाव वेगाने वाढत होता. जाणून घ्या स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो आणि त्यामागील इतिहास, महत्त्व
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यापूर्वी भारत सुमारे 200 वर्षे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. या स्वातंत्र्यामागे अनेक दशकांचा संघर्ष, चळवळ आणि त्याग लपलेला आहे. त्यानंतर 1857 च्या क्रांतीपासून ते महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळ, मीठ सत्याग्रह आणि भारत छोडो चळवळीपर्यंत, प्रत्येक पावलाने स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला.
स्वातंत्र्य दिन आणखी खास मानला जातो. कारण हा दिवस केवळ इतिहासाची आठवण करुन देत नाही तर भविष्यासाठी देशाला मजबूत करण्यासाठी देखील प्रेरणा देतो. या प्रसंगामुळे आपल्याला एकता, बंधुता आणि विकासाच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा देतो.
पारतंत्र्याचे चटके सहन केलेल्या भारतीयांना जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय होता. त्यामुळे या पिढीला स्वतंत्र्याची दाहकता, त्याचे महत्त्व त्याची गरज माहिती होती त्यामुळे हे सर्वच स्वतंत्र प्राप्तीचा आनंद अगदी सण उत्सवाप्रमाणे साजरे करीत असतं आणि आजही हा आनंद कमी झाला असे नाही. पण त्यातील दाहकता कमी होत चालली आहे. झेंडावंदन नंतर देशभक्तीपर गीते गायली जायची. काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे. गावागावात, शहराशहरात वंदे मातरम्, भारत माता की जय असा उद्घोष होत, प्रभातफेरी काढली जात. फक्त शाळेतील मुलंचं नाही तर घरातील प्रत्येक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असे अशा विविध पद्धतीने गाव शहरांमध्ये स्वातंत्र्य दीन उत्साहात साजरा केला जातो.
देशाच्या विविध भागात पूर्वी काळी स्वतंत्र दीन साजरा करण्याच्या विविध पद्धती असतील तरीसुद्धा झेंडावंदन, प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबविले जात ही कॉमन पद्धत होती. कोल्हापूर, सांगलीमध्ये या दिवशी जिलेबी खाण्याची पद्धत आहे, तर मुंबईमध्ये या दिवशी सोसायटी, चाळींमध्ये सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केले जाते. सकाळी सोसायटी झेंडावंदन, दुपारी पूजा व रात्री देशभक्तीपर गीताचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजन केले जाते. गावपातळीवर या दिवशी मैदानी खेळांचे सामने भरविले जातात.