फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे तर दहीहंडी शनिवार, 16 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. जन्माष्टमीचा सोहळा वृंदावन आणि मथुरेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक अनेक उपाय करतात. त्यातील एक उपाय म्हणजे मोरपंख. मोरपंखाचे हे उपाय अधिक प्रभावी असे आहेत. मात्र हे मोरपंख जन्माष्टमीच्या वेळी घरामध्ये कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावे, तसेच ते ठेवल्याने काय फायदे होतात, ते जाणून घेऊया.
मोरपंखाचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. श्रीकृष्णाला मोर आणि मोरपंख खूप आवडतात असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात मोरपंख ठेवल्याने सुख आणि समृद्धी येते. घरात मोरपंख ठेवल्याने वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा येते.
असे मानले जाते की, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि मानसिक शांती मिळविण्यासाठी बैठकीच्या खोलीत किंवा देव्हाऱ्यात मोरपंख ठेवणे चांगले मानले जाते त्यामुळे घरामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण राहते. त्यासोबतच तुम्ही मोरपंख तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा. तसेच उत्तर दिशेला ठेवू शकता. असे केल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. त्याबरोबरच व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता वाढते.
मोरपंखाला वाईट नजरेपासून संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा मुलांच्या खोलीत ठेवल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. तसेच कुटुंबाचे रक्षण देखील होते.
घरात मोरपंख ठेवल्याने वातावरण शुद्ध आणि उर्जेने भरलेले राहते. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करते आणि व्यक्तीवरील मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. विशेषतः बेडरूममध्ये ठेवल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
अभ्यासाच्या खोलीत किंवा ज्या ठिकाणी मुल अभ्यासाला बसतात त्याठिकाणी मोरपंख ठेवल्याने मुलांमधील एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. त्याची ऊर्जा मनाला स्थिर करते आणि विचलित होण्यास प्रतिबंध करते. विद्यार्थ्यांसाठी ते विशेषतः फायदेशीर मानले जाते.
भगवान श्रीकृष्णांना मोरपंख खूप आवडते त्यामुळे ते देव्हाऱ्यात ठेवल्याने त्यांचे आशीर्वाद अबाधित राहतात. देव्हाऱ्यात भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोजवळ हे ठेवणे फायदेशीर मानले जाते. यामुळे जीवनात आनंद, शांती, सौभाग्य आणि आध्यात्मिक प्रगती होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)