फोटो सौजन्य- istock
शुक्रवार, 18 जुलैचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज सर्व मूलांकांच्या लोकांवर आज मंगळाचा प्रभाव राहील. शुक्रवारचा अधिपती ग्रह शुक्र असल्याने त्याची संख्या 6 मानली जाते. मूलांक 6 असलेल्या लोकांना आज नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल, कारण तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. तर मूलांक 9 असलेल्या लोकांनी कामाच्या ठिकाणी घाई करणे टाळावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेले लोक व्यवसायाशी संबंधित जबाबदाऱ्यांमध्ये अडकू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही. परंतु तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. तुम्हाला मुलांशी संबंधित चिंता असू शकतात, ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. अनावश्यक खर्च करणे टाळा.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. तसेच तुम्ही मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांशी संपर्कात राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे लागेल. महत्त्वाची कामे अपूर्ण राहिली असल्यास ती आज पूर्ण होतील. एखादे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. शिक्षण किंवा सर्जनशील कामात तुम्हाला यश मिळू शकते.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद साधताना तुम्हाला स्पष्टता राखावी लागेल, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मूलांक 5 असलेल्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन संधी मिळू शकतात. एखाद्या योजनेत गुंतवलेल्या पैशातून लाभ होऊ शकतो. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहात त्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा. व्यवसायामध्ये कोणतेही निर्णय घेताना घाई करु नका.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा दिवस मिश्रित असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. तुमचा मानसिक ताण कमी होईल. सर्जनशील कामात तुमची आवड वाढू शकते.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मात्र तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला थकवा आणि सुस्ती जाणवू शकते. आहाराकडे लक्ष द्या अन्यथा पचनाच्या कोणत्याही समस्येमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
मूलांक 8 असलेले लोक आज थोडे थकलेले असू शकतात. तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा देखील निर्माण होऊ शकते. जे लोक नवीन व्यवसायाची सुरुवात करु इच्छिता त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण होतील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पोट आणि पचनाशी संबंधित कोणत्याही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)