फोटो सौजन्य- pinterest
श्रावण शिवरात्रीला ग्रहांचे शुभ संयोजन होत आहे. जे 24 वर्षांनी श्रावण शिवरात्रीला पुन्हा उपस्थित राहतील. 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 18 जुलै 2001 मध्ये चंद्र मिथुन राशीमध्ये संक्रमण करत होता. तर यंदा 2025 मध्ये श्रावण शिवरात्री बुधवारी आहे. शुक्र ग्रह सवशिवरात्रीला आपल्या मूलत्रिकोण राशीत वृषभ राशीत बसून मालव्य राजयोग निर्माण करत आहेत, तर चंद्र आणि गुरू देखील 24 वर्षांनंतर गजकेसरी योग निर्माण करत आहेत, श्रावण शिवरात्रीला मिथुन राशीत संक्रमण करत आहेत. शिवरात्रीला इतर अनेक योग तयार होत आहे. मात्र ग्रहांमधील दोष देखील दूर होतात. या योगांपैकी एक म्हणजे बुधादित्य योग होय. यावेळी शुक्र, गुरू आणि सूर्य देखील एका स्थितीत असल्याने उत्तम योगायोग तयार होत आहे. श्रावण शिवरात्रीला ग्रहांच्या संयोगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
शुक्र ग्रह वृषभ राशीत असल्याने या राशीमध्ये मालव्य राजयोग तयार होत आहे. वृषभ राशीच्या लोकांना महादेवांच्या कृपेने आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच हे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करु शकतात. या काळामध्ये तुम्ही मालमत्तेची खरेदी करु शकता. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.
मिथुन राशीमध्ये गजकेसरी राजयोग तयार होत आहे. या राशीमध्ये गुरु आणि चंद्र एकत्र असल्याने तुम्हाला या योगाचा फायदा होणार आहे. करिअरमध्ये कमाईच्या चांगल्या संधी मिळतील. गजकेसरी राजयोगामुळे संपत्ती, समृद्धी आणि आदर मिळेल. तसेच या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतात.
वृश्चिक राशीमध्ये मालव्य राजयोग तयार होत आहे. या योगामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतात. या काळामध्ये तुम्ही नवीन वाहनांची खरेदी करु शकता. विवाहित लोकांसाठी हा काळ विशेषतः फलदायी असेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूपच मजबूत असेल.
धनु राशीमध्ये गजकेसरी योग तयार होत आहे. या राशीमध्ये गुरु आणि चंद्राची सप्तम दृष्टी असेल. तसेच तुम्हाला आदर, उच्च पद आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांचा समाजामध्ये दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यांकडे तुमचा कल अधिक असेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)