फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 7 जून. शनिवारचा दिवस शनि देवाला समर्पित आहे. शनिची संख्या 8 मानली जाते. तर 7 क्रमांकाचा ग्रह केतू मानला जातो. अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेल्या लोकांना एकांतात राहणे आवडते आणि मूलांक 8 असलेले लोक कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घेऊ शकतात त्यामुळे या मूलांकांच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागू शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या.
मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका बजवावी लागू शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या आणि सहकाऱ्यासाठी महत्त्वाचा असा निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला तुमचे काम पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण करावे लागेल. या सर्वांचा तुम्हाला फायदा होईल.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगू शकता यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. कोणताही निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक घ्या. प्रत्येक अडचणीवर तुम्ही मात कराल.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यामुळे लोकांवर प्रभाव पडेल. तुमच्या मनात एखादी जुनी योजना पुन्हा येऊ शकते. तुम्ही तुमच्या मित्र परिवारांसोबत आज बाहेर जायचा प्लॅन करु शकता.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी विशेष योजना आखाव्या लागतील. तुम्ही प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकता. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या
मूलांक 5 असलेले लोक कामात व्यस्त राहतील. या लोकांना काही नवीन बदलांना सामोरे जावे लागू शकते. तंत्रज्ञान, संप्रेषण किंवा मार्केटिंग क्षेत्राशी लोक कामात व्यस्त राहतील. आज नवीन लोकांशी ओळख होऊ शकते.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहणार आहे. आज तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता त्यामुळे तुमचे मन शांत राहील. कला, संगीत किंवा भावनिक जोडणीशी संबंधित काम केल्याने तुमचे मन आनंदी राहील.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल असेल. तुम्हाला एखादा सखोल विषय वाचण्यात आणि एकांतात वेळ घालवण्यात अधिक रस असेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी शिस्तीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आज तुम्हाला खर्च करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कोणताही निर्णय घाई न करता विचारपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या बोलण्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
आज मूलांक 9 असलेल्या लोकांचा दिवस उत्साहाचा असेल. खूप दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. तुमची ऊर्जा योग्य दिशेने केंद्रित केल्याने खूप फायदे मिळण्याची अपेक्षा आहे. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)