फोटो सौजन्य- istock
अंकशास्त्रानुसार आजचा रविवारचा अधिपती ग्रह सूर्य आहे. सूर्याची संख्या 1 मानली जाते. मूलांक 1 असलेल्या लोकांचा कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. हे लोक कामामध्ये नेतृत्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच मूलांक 6 असलेल्या लोकांच्या जीवनामध्ये गोडवा टिकून राहील. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तुम्ही कामामध्ये नेतृत्वाची भूमिका बजावू शकता. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही व्यस्त राहू शकतात.
मूलांक 2 असलेल्या लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना असू शकतात. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. कोणतेही निर्णय घेताना घाई करु नका. सर्जनशील कामासाठी आजचा दिवस चांगला असेल.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. धार्मिक आणि प्रशासकीय कर्मचारी असलेल्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आदर मिळू शकतो. मानसिक शांती मिळेल.
मूलांक 3 असलेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी काही योजना अपेक्षेपेक्षा हळू पुढे जाऊ शकतात. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. निर्णय घेताना घाई करणे टाळा.
मूलांक 5 असलेल्या लोकांना नवीन बदलांना सामोरे जावे लागू शकते. कामानिमित्त तुम्ही प्रवास करु शकता. कम्युनिकेशन, मार्केटिंग आणि डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचा फायदा होईल. व्यावसायिकांना नवीन संपर्क तयार करणे फायदेशीर ठरेल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जोडीदारावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. जोडीदारासोबत भावनिक सखोलता निर्माण होईल. कला, फॅशन, संगीत किंवा कार्यक्रम नियोजन यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे आज कौतुक होऊ शकते.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. हे लोक अध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी होतील. लेखक, संशोधक, उपचार करणारे किंवा मानसिक विश्लेषणात्मक काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप फलदायी ठरू शकतो. तुमची अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्ण होतील.
मूलांक 8 असलेले लोक आज कामामध्ये व्यस्त राहतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज संयम राखणे तुमच्यासाठी उत्तम राहील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. कोणत्याही वादविवादात पडू नका. क्रीडा, सैन्य, क्रीडा किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणारे लोक आज काही धाडसी निर्णय घेऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहाल त्याचा तुम्हाला फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)