फोटो सौजन्य- pinterest
देवशयनी एकादशी आज रविवार 6 जुलै रोजी आहे. देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात त्यालाच चातुर्मास असे म्हणतात. या चार महिन्याच्या कालावधीमध्ये जप, तप, पूजा आणि ध्यान करण्यासाठीचा हा काळ मानला जातो.
मान्यतेनुसार, देवशयनी एकादशीच्या दिवशी मागील जन्मातील पापांचा नाश करण्यासाठी आणि जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यावेळी चारमुखी दिवा लावण्याला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवसाला संबंधित पौराणिक कथा देखील आहे. जाणून घ्या देवशयनी एकादशीच्या दिवशी चारमुखी दिवा लावण्यासंबंधित कथा.
आषाढ शुक्ल पक्षाची एकादशी तिथीची सुरुवात 5 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी होईल आणि त्याची समाप्ती 6 जुलै रोजी रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीचे व्रत रविवार, 6 जुलै रोजी पाळले जाणार आहे.
या दिवशी काही शुभ योग देखील तयार होत आहे. यापैकी त्रिपुष्कर योग, रवी योगासोबत अनुराधी नक्षत्र देखील तयार होत आहे. यावेळी त्रिपुष्कर योग रात्री 9.14 ते 10.42 पर्यंत असेल तर रवी योग सकाळी 5.56 ते रात्री 10.42 पर्यंत असेल. यावेळी पूजा केल्याने पुण्य लाभते असे म्हटले जाते.
एकादशीच्या दिवशी चारमुखी दिवा लावला जातो. कारण चार मुखी दिव्याच्या चार वाती पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांना पसरलेल्या असतात त्यामुळे चारही दिशांना नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहते अशी मान्यता आहे. चारमुखी दिव्याला चातुर्मासाचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की, विष्णू विश्वाचे व्यवस्थापन करत नसताना चारमुखी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असे मानले जाते. ट
असे म्हटले जाते की, भगवान रामाचे पूर्वज राजा मांधात हे इक्ष्वाकु वंशाचे राजा होते. त्यांना शौर्य, धार्मिकता आणि दानधर्मासाठी ते प्रसिद्ध आहेत. मान्यतेनुसार ते एक शक्तिशाली आणि न्यायी राजा होते ज्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये शांती आणि आनंद प्रस्थापित झाला होता.
कथेनुसार त्यांच्या राज्यामध्ये एकदा प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यामुळे लोकांना अन्न आणि पाणी यांसारख्या समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत होते. त्यावेळी आपल्या प्रजेच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी म्हणून राजा जंगलात गेला. भटकंती करत असताना तो भंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला. त्यावेळी त्याने राजा मांधाताला आपल्या समस्या समजावून सांगितल्या. ऋषींनी त्यांच्याकडे पाहून आपल्या दिव्यदृष्टीने सांगितले की, हे सर्व तुझ्या मागच्या जन्मातील पापामुळे घडत आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)