फोटो सौजन्य- pinterest
आजचा बुधवारचा दिवस विशेष राहणार आहे. आज पाडवा देखील आहे. आज राहू ग्रहाचा प्रभाव सर्व अंकांच्या लोकांवर दिसून येईल.आज बुधवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध राहील. बुध ग्रहाचा अंक ५ आहे. मूलांक ५ असलेल्या लोकांना कुटूंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मूलांक १ ते ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमचे वरिष्ठ काही कारणास्तव कामावर तुम्हाला त्रास देऊ शकतात. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या कामात समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. ज्यामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल.
मूलांक २ असलेल्या लोकांना आजचा दिवस सावध राहावे. तुमच्याच लोकांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. कोणतेही काम आत्मविश्वासाने करणे आणि स्वावलंबी राहणे चांगले. स्वतःचे निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही जोडीदारासोबत तुमचे विचार शेअर करु शकता.
मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. वैयक्तिक बाबींबद्दल तुम्हाला स्वतःबद्दल खूप निराशा वाटू शकते. विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. खूप मेहनत घ्यावी लागेल. आज कुटुंबात सामान्य वातावरण राहील.
मूलांक ४ असलेल्या लोकांनी आज सावधानता बाळगावी. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. तुम्ही जास्त राग करणे टाळावे आणि विचारपूर्वक बोलावे. तुम्ही मित्रासोबत दर्जेदार वेळ घालवू शकता. त्यामुळे तुमचा ताण कमी होऊ शकतो.
मूलांक ५ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. जर तुम्हाला काही समस्या येत असल्यास तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. यामुळे तुमची परिस्थिती हळूहळू सुधारेल. काही विरोधक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील.
मूलांक ६ असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील आणि जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्प आणि असाइनमेंट मिळू शकतात. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो त्यामुळे तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे.
मूलांक ७ असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. कोणत्याही संघर्षापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबींमध्येही तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला लोकांशी संपर्क साधण्यात अडचण येऊ शकते.
मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवेश करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तुम्ही तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत शेअर करू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. धार्मिक कार्यांकडे तुमचा कल वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही व्यस्त राहू शकता. तुम्हाला स्वतःच्या गरजा देखील पूर्ण कराव्या लागतील. कुटुंबामध्ये शांत वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)