
फोटो सौजन्य-pinterest
हस्तरेखाशास्त्रानुसार, आपल्या हातावरील रेषांशिवाय काही विशिष्ट ‘चिन्हे’ अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानली जातात. जर तुमच्या तळहातावर कमळ, शंख किंवा माशासारखी चिन्हे असतील, तर ते साक्षात राजयोगाचे लक्षण मानले जाते. ही चिन्हे पूर्वपुण्याईने किंवा सत्कर्मामुळे हातावर उमटतात असे मानले जाते. तळहातावरील ही चिन्हे शुभ अशुभ परिणाम दर्शवितात. तुमच्या तळहातावरील चिन्हांचा अर्थ काय होतो ते जाणून घेऊया.
कमळाचे चिन्ह कमळ हे माता लक्ष्मीचे प्रिय आसन आहे. ज्यांच्या हातावर कमळाचे स्पष्ट चिन्ह असते, त्यांच्यावर लक्ष्मीची अखंड कृपा असते. असे लोक शून्यातून विश्व निर्माण करतात. त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासत नाही. हे लोक धार्मिक आणि समाजात मान-सन्मान मिळवणारे असतात. तळहातावरील हे चिन्ह शुभ आणि दुर्मिळ मानले जाते. जे प्रामुख्याने प्रचंड संपत्ती, अपार यश आणि सुख-समृद्धीचे संकेत देते. या चिन्हाला ‘विष्णू योग’ म्हणतात.
तळहातावर, विशेषतः आयुष्य रेषेच्या शेवटी किंवा केतू पर्वतावर माशाचे चिन्ह असणे अत्यंत शुभ असते. माशाचे चिन्ह हे परदेशा प्रवासाचे आणि अचानक धनलाभाचे संकेत देते. असे लोक खूप बुद्धिमान असतात आणि त्यांचे वृद्धकाळ अत्यंत सुखात जातो. ज्या व्यक्तीच्या तळहातावर हे चिन्ह असते ती व्यक्ती उच्च पदस्थ, हुशार आणि नशीबवान असते, ज्यांचे वृद्धापकाळ सुखात जाते असे म्हटले जाते.
शंख हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे. ज्याच्या तळहातावर किंवा बोटांच्या अग्रभागी शंखाचे चिन्ह असते, ते लोक नशीबवान मानले जातात. शेखाचे चिन्ह असणारे लोक उत्तम वक्ते किवा प्रशासकीय अधिकारी बनतात. त्यांच्या शब्दाला समाजात वजन असते आणि त्यांच्याकडे ऐश्वर्याची कमतरता नसते. हे चिन्ह भगवान विष्णूंचे प्रतीक असून, व्यक्तीला कमी कष्टात मोठे यश, प्रचंड धनसंपत्ती आणि राजेशाही जीवन मिळवून देते.
हे चिन्ह संघर्षातून विजयाचे प्रतीक आहे. ज्यांच्या हातावर धनुष्य किवा बाणाचे चिन्ह असते, त्यांची इच्छाशक्ती प्रचंड असते. कितीही संकटे आली तरी हे लोक त्यावर मात करून आपले ध्येय गाठतात. हे लोक साहसी आणि पराक्रमी असतात.
स्वस्तिक हे मांगल्याचे आणि गणेशाचे प्रतीक आहे. हातावर स्वस्तिक असणे म्हणजे ईश्वरी संरक्षण असणे. असे लोक अत्यंत नीतिमान असतात आणि त्यांच्या हातून नेहमी समाजहिताची कामे घडतात.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: काही चिन्हे जन्मजात असतात, तर काही जीवनातील कर्म, विचार आणि परिस्थितीनुसार हळूहळू स्पष्ट होत जातात असे मानले जाते.
Ans: होय. उजवा हात (कर्माचा हात) वर्तमान व भविष्य दर्शवतो, तर डावा हात पूर्वजन्माचे संस्कार आणि नशीब दाखवतो.
Ans: तळहातावर कमळ, मासा, शंख, धनुष्यबाण आणि स्वस्तिक ही चिन्हे असणे शुभ मानले जाते