फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवारचा शासक ग्रह शुक्र आहे. त्यामुळे शुक्राचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर राहील. शुक्राची संख्या 6 मानली जाते. मूलांक 4 असणाऱ्या लोकांना कठीण परिस्थितींला तोंड द्यावे लागेल. तर मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नातेसंबंधात गोडवा राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या.
मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजवावी लागू शकते. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. आर्थिक स्थिरता राहील. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
मूलांक 2 असलेल्या लोकांच्या मनात अनेक भावना असतील. कामाच्या कठोर मेहनत घ्यावी लागेल. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मानसिक शांती मिळेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीची भेट होईल.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. शिक्षण, प्रशासन किंवा वित्त या क्षेत्राशी संबंधित लोक प्रकल्पात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते. कोणतेही निर्णय घेताना कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी योजना बदलण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञान, प्रशासन किंवा बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मार्केटिंग, सेल्स, पत्रकारिता आणि शिक्षणाशी संबंधित लोकांसाठीही आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. नातेसंबंधामध्ये गोडवा राहील.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. हे लोक आज परिवारासोबत वेळ घालवतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करतील त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक समस्या जाणवू शकतात.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांनी सामाजिक कार्यांपासून दूर राहावे. संशोधन, लेखन, अभ्यास किंवा तांत्रिक क्षेत्रात गुंतलेले लोक कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन करतील. जुन्या कागदपत्रांमधून महत्त्वाची माहिती मिळू शकते. मानसिक शांती मिळेल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांना आज खूप मेहनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर दबाव येऊ शकतो. आर्थिक लाभ होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. या लोकांना कोणत्याही आव्हानाला न घाबरता तोंड द्यावे लागेल. सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय राहाल. ज्यामुळे तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)