फोटो सौजन्य- istock
वास्तुशास्त्रामध्ये क्रॅसुला वनस्पतीला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, हे रोप घरात लावणे म्हणजे कुबेराचे आशीर्वाद मिळतात. तसेच जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. क्रॅसुला वनस्पती नशीब, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. या वनस्पतीला इंग्रजीमध्ये मनी ट्री असे देखील म्हटले जाते. जर वनस्पती चुकीच्या दिशेने लावल्यास त्याचे अशुभ परिणाम मिळतात. क्रॅसुला वनस्पती लावण्यासाठी योग्य दिशा कोणती, जाणून घ्या
क्रॅसुला वनस्पती घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही तर कायम सकारात्मक ऊर्जा राहते. मान्यतेनुसार हे रोप घरी लावल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तसेच आर्थिक संकटे देखील संपतात. घरामध्ये क्रॅसुला वनस्पती लावल्यास गरिबी दूर होण्यास मदत होते. असे मानले जाते की, परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहून नातेसंबंधामध्ये असलेले मतभेद दूर होतात. तसेच वास्तूदोषापासून देखील सुटका होते.
जीवनामध्ये पैशाची कमतरता भासत असल्यास क्रॅसुला वनस्पती लावणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ही वनस्पती घरामध्ये नेहमी उत्तर दिशेला लावावी. याशिवाय तुम्ही ईशान्य दिशेला देखील ठेवू शकता. ही वनस्पती ठेवण्यासाठी दोन्ही दिशा सर्वोत्तम मानल्या जातात. तसेच व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि करिअरमध्ये देखील प्रगती होते.
घरामध्ये वनस्पती लावणे खूप शुभ मानले जाते. मात्र, ही वनस्पती सुकलेली किंवा त्याची पाने सुकलेली असतील अशा पद्धतीची असल्यास परिवारामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. त्याचसोबत वनस्पतीची वाढ होत नसल्यास देखील ती घरामध्ये ठेवू नये.
मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला ही वनस्पती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना याचा फायदा होतो.
क्रॅसुला वनस्पती घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे सूर्यप्रकाश येत असेल. तसेच वनस्पतीची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
वास्तुशास्त्रात म्हटल्यानुसार, क्रॅसुला वनस्पती ड्रॉईंग रुम किंवा बाल्कनीत ठेवल्यास आजूबाजूनचे वातावरण देखील प्रसन्न राहते.
मात्र ही वनस्पती घरामध्ये स्वयंपाकघर आणि शौचालयाजवळ चुकूनही क्रॅसुला वनस्पती ठेवू नये.
या वनस्पतीला आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी द्यावे. त्याची योग्य ती काळजी घ्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)