फोटो सौजन्य- pinterest
आज 19 सप्टेंबरचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. कारण आज प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्र हे दोन महादेवाचे व्रत आहे. आज अंक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव दिसून येईल. आज शुक्रवारचा दिवस आहे ज्यांचा स्वामी ग्रह शुक्र आहे त्याचा अंक 6 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळतील आणि जोडीदाराची साथ मिळेल. तर मूलांक 6 असलेले लोक व्यवसाय पुढे नेण्यासाठी योजना आखू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील आणि अडकलेले पैसे परत मिळतील. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. खेळाशी संबंधित असलेल्यांना विजेतेपद मिळू शकते.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही जास्त भावनिक होऊ शकता. कुटुंबाच्या बाबतीत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक लाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नकारात्मक विचारापासून दूर रहा नाहीतर तणाव वाढू शकतो. वाद घालणे टाळावे. नोकरी करणाऱ्याना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. व्यवसायाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकतात. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत मिळून एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्येने भरलेला असतो. कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबामध्ये तणाव जाणवू शकतो. कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा नुकसान होईल. यावेळी गुंतवणूक करताना सांभाळा. कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर राहील त्यामुळे तणाव देखील दूर होईल.
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील आणि दीर्घकाळापासून पैसे अडकले असतील तर ते परत मिळतील. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)