फोटो सौजन्य- pinterest
गुरु ग्रह त्याच्या नक्षत्र स्थानाच्या मुख्य टप्प्यात आहे. यंदा तो सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्या तिसऱ्या नक्षत्रामध्ये म्हणजे पुनर्वसु नक्षत्रात आपले संक्रमण करणार आहे. हे नक्षत्र संक्रमण शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2.1 वाजता घडणार आहे. या वर्षात गुरूच्या नक्षत्र स्थानाच्या संक्रमणाचे महत्त्वाचे टप्पे आहेत. या महिन्यामध्ये गुरु ग्रह पुनर्वसु नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे.
याआधी त्याने 13 ऑगस्ट रोजी पुनर्वसु नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात आपले संक्रमण केले होते. तर 30 ऑगस्ट रोजी त्याने दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश केला होता आणि आता तिसऱ्या टप्प्यामध्ये तो आजपासून संक्रमण करणार आहे. गुरु ग्रहच्या संक्रमणाचा कोणाला फायदा होणार जाणून घ्या
देवांचा गुरू बृहस्पति, मिथुन राशीमध्ये आहे. दरम्यान तो दिवाळीपूर्वी आपली राशी बदलेल. 18 ऑक्टोबर रोजी गुरु कर्क राशीत संक्रमण करेल. त्याआधी, 19 सप्टेंबर रोजी त्याने गुरु पुनर्वसु नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात आपले संक्रमण करणार आहे.
मेष राशीच्या लोकांना हा काळ म्हणजे सुवर्णसंधी असणार आहे. गुरु राशीच्या नक्षत्र स्थानात होणाऱ्या संक्रमणामुळे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल आणि तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. या काळात जे लोक नवीन व्यवसायाची सुरुवात करणार आहे त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. तुमच्या कारकिर्दीतही यश मिळण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांना गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल. तुम्ही तुमच्या समस्या स्वतः सोडवू शकाल. तसेच तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. मोठ्या भावाकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. आयात-निर्यात संबंधित कामामुळे आर्थिक फायदा होईल. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक स्थैर्य वाढेल आणि तुमच्या करिअरबाबत सकारात्मक बातम्या मिळू शकतात. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कोणाचाही अपमान टाळा आणि तुमचे बोलणे शुद्ध ठेवा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)