फोटो सौजन्य- pinterest
आजचा 19 ऑक्टोबरचा दिवस. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. अंक 1 असणाऱ्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आजच्या रविवारचा दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांच्या कामात येणारे अडथळे दूर होतील आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्हाला कामामध्ये अडथळा येत असेल तर ते लवकर दूर होतील. व्यवसायामध्ये अपेक्षित लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून मनोरंजननाचे कार्यक्रम पाहू शकता. जोडीदारासोबत आजचा चांगला वेळ घालवाल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धी आणि समजुतीने तुम्ही काम पूर्ण कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारी नोकरीचा प्रस्ताव येऊ शकतो. ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. कुटुंब आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते. अशावेळी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. नाहीतर मानसिक तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी नियोजित केलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायामध्ये प्रगती होईल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. एखाद्या मित्रांसोबत वाद होऊ शकतो. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये नवीन लोकांची ओळख होईल. नोकरी करणाऱ्या लोकांची कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी लाभ होऊ शकतो.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध रहावे. कोणताही निर्णय घाईमध्ये घेऊ नका अन्यथा नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात त्यामुळे तणाव दूर होईल. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)