फोटो सौजन्य- pinterest
19 ऑक्टोबर रोजी ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या एक महत्त्वाची घटना घडणार आहे. ज्ञान, संपत्ती, धर्म आणि शुभतेचा ग्रह गुरू या दिवशी दुपारी 12.57 वाजता कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरु ग्रहाचे हे संक्रमण 4 डिसेंबरपर्यंत होणार आहे. त्यानंतर तो रात्री 8.39 वाजता मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरूच्या या संक्रमणाचा 12 राशीवर नव्हे तर संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होणार आहे. हा बदल काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना शुक्र गुरु ग्रहाचा आशीर्वाद मिळणार आहे, ते जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांना हा काळ खूप फायदेशीर राहणार आहे. या काळामध्ये तुम्हाला जीवनात अनेक बदल होताना दिसून येतील. ज्यामुळे स्थिरता आणि समृद्धी येईल. या काळात गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित नवीन योजना तुम्ही आखू शकतात. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. लग्नामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संबंधित चांगली बातमी मिळू शकेल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. करिअरच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रशंसा होईल. तसेच तुम्हाला नवीन संधी देखील मिळतील. गुरूच्या प्रभावामुळे प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात जे लग्नापर्यंत पोहोचू शकतात. हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर राहील. मग तो परीक्षा असो किंवा कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रातील कामगिरी असो. कला आणि सर्जनशीलतेमध्ये गुंतलेल्यांना त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी उत्तम संधी मिळतील. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून भविष्यात आर्थिक नफा मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा काळ खूप चांगला राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहणार आहे. व्यवसायामध्ये केलेले उपक्रम फायदेशीर ठरु शकतात. गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने, बराच काळ रखडलेला मोठा प्रकल्प आता यशस्वी होऊ शकतो. उत्पन्नाचे अनेक स्रोत विकसित होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ते स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. तुमचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील. तुमच्या मुलांबद्दलच्या चिंता कमी होतील आणि आरोग्यही चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)