फोटो सौजन्य- pinterest
आज 20 जुलै रविवार. अंकशास्त्रानुसार मूलांक 2 चा स्वामी चंद्र ग्रह आहे. त्यामुळे सर्व लोकांवर आज चंद्राचा प्रभाव दिसून येईल. रविवारचा स्वामी ग्रह चंद्र असतो आणि त्याचा अंक 1 असतो. त्यामुळे मूलांक 1 असणारे लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल आणि कामाच्या ठिकाणी काही तरी नवीन करण्याची जिद्द बाळगतील. तर मूलांक 2 असणाऱ्यांनी कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो. एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.
मूलांक 2 असणाऱ्यांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला वाईट वाटू शकते. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. नाहीतर नुकसान होईल.
मूलांक 3 असणाऱ्या असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्याना यश मिळेल. अनावश्यक खर्च करणे टाळा नाहीतर नुकसान होऊ शकते.
मूलांक 4 असणाऱ्याचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुमच्या व्यवसायात काही बदल होऊ शकतात. तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. धार्मिक कार्यात रास वाढेल.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय क्षेत्रात असणाऱ्या लोकांची नवीन लोकांची ओळख होईल. जे लोक मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात रस वाढेल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस अनुकूल असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कला, संगीत क्षेत्राशी संबंधित असलेल्याना यश मिळेल.
मूलांक 7 असणाऱ्यांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 8 असणाऱ्यांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी होऊ शकता. कोणाशी वाद घालणे टाळा.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात तुम्हाला वडिलांचा पाठिंबा मिळेल. आज जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)