फोटो सौजन्य- istock
शुक्र ग्रहाला संपत्ती, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचे प्रतिनिधित्व ग्रह मानला जातो. ज्या राशीमध्ये तो प्रवेश करतो त्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरतो. यावेळी 26 जुलै रोजी तो मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 20 ऑगस्टपर्यंत त्याच राशीमध्ये राहील. तर बुध ग्रहाला मिथुन राशीचा स्वामी मानले जाते. या ग्रहाला बुद्धिमत्ता, संवाद आणि कल्पनांचे प्रतीक मानले जाते.
शुक्र ग्रहाच्या या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसून येतो. या ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनामधील आर्थिक समस्या दूर होतात तर काहींना सकारात्मक परिणाम मिळतात. काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागते. शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर कसे परिणाम होतात, ते जाणून घेऊया
शुक्र ग्रह मेष राशीमध्ये दुसऱ्या आणि सातव्या घरामध्ये आहे. त्याच्या संक्रमणाचा या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होताना दिसून येऊ शकतो. तुमची नवीन लोकांची ओळख होऊ शकते ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमचे वैयक्तिक संबंध चांगले राहतील.
सिंह राशीच्या तिसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्याचे हे संक्रमण संह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या काळामध्ये सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. तुमचे आरोग्य चांगले राहील. आर्थिक स्थिती स्थिर राहील. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील.
शुक्र ग्रहाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणारे राहील. शुक्र ग्रह तूळ राशीमध्ये आठव्या घरामध्ये आहे. या काळामध्ये काही लोकांना परदेश दौरा करण्याच्या संधी मिळू शकतात. घरामध्ये काही चांगल्या घटना घडू शकतात. तसेच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
शुक्र ग्रह हा वृश्चिक राशीमध्ये सातव्या आणि बाराव्या घराचा स्वामी असल्याने त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तसेच तुम्हाला जुन्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. त्यासोबतच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.
कुंभ राशीमध्ये शुक्र ग्रह चौथ्या ग्रहाचा स्वामी आहे. या काळामध्ये मीन राशीतील विद्यार्थ्यांना विशेष फायदा होऊ शकतो.
कला आणि साहित्याशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. त्याचप्रमाणे करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील तर नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ होऊ शकते. तुमचे आरोग्य देखील चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)