
Numerology Horoscope 20 October 2026 ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस एकदम भारी आहे. तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला दिसेल. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात नशीब तुमची साथ देईल. बऱ्याच दिवसांपासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल तर आज त्याबद्दल चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. बॉस किंवा एखादी मोठी व्यक्ती तुमची मदत करेल. त्यामुळे तुमचं काम सोपं होईल. प्रेमाच्या बाबतीत पण दिवस चांगला आहे.
मूलांक 2 वाल्यांसाठी आज थोडा तणावाचा दिवस आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, कामाचा लोड जास्त असेल. तुम्ही जर अहंकारात किंवा रागात वागलात तर कामं बिघडू शकतात. त्यामुळे जरा शांतपणे घ्या. नवीन जबाबदारी मिळाल्याने थोडी धावपळ होईल. तब्येतीकडे लक्ष द्या. बाहेरचं थंड किंवा तेलकट खाणं टाळा, नाहीतर त्रास होऊ शकतो. वागण्यात गोडवा ठेवला तर सगळं सुरळीत होईल.
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. ऑफिसमध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहात. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण मदत करतील आणि टीमवर्कमुळे एखादा मोठा प्रोजेक्ट लवकर पूर्ण होईल. तुम्ही दुसऱ्यांना मदत कराल आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्की होईल. समाजात तुमची इज्जत वाढेल. पैशाच्या बाबतीत पण एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे.
Dussehra: दसऱ्याला राशीनुसार करा या गोष्टींचे दान, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
मूलांक 4 साठी आज मेहनतीचा दिवस आहे. तुमच्या हुशारीने आणि मेहनतीने तुम्ही सगळ्यांचं मन जिंकाल. ऑफिसमध्ये एखादं अडकलेलं काम तुम्ही पूर्ण कराल आणि बॉसची शाबासकी मिळवाल. प्रेमात असणाऱ्यांसाठी पण दिवस चांगला आहे. नातं पुढच्या लेव्हलवर जाऊ शकतं. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, बोलताना जरा प्रेमाने आणि आपुलकीने बोला.
आज तुम्हाला कामासाठी बाहेर जावं लागू शकतं. प्रवासाचा योग आहे. पण प्रवासात खर्च खूप होईल, त्यामुळे जपून राहा. व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील आणि तुमचे संपर्क वाढतील. पैशाची स्थिती मजबूत राहील. जर गुंतवणूक करायचा विचार असेल तर आधी एखाद्या जाणकाराचा सल्ला नक्की घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर जेवा आणि आराम करा.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभाचा आहे. एखाद्या नवीन व्यक्तीसोबत झालेली डील तुम्हाला पैसा मिळवून देईल. जुनी देणी असतील तर ती पण वसूल होतील. पण विनाकारण खर्च करणं थांबवा. प्रेमाच्या नात्यात जवळीक वाढेल. एकमेकांवरचा विश्वास अजून वाढेल. घरातलं वातावरण पण आनंदी राहील.
आज संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. रागाच्या भरात किंवा घाईघाईत घेतलेला निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो. पैशाचं नुकसान तर होईलच पण समाजात तुमची इमेज पण खराब होऊ शकते. जोखमीचं काम असेल तर दोनदा विचार करा. गाडी चालवताना लक्ष द्या. राग कमी करण्यासाठी थोडा वेळ ध्यान करा किंवा शांत बसा.
Navratri: वैवाहिक जीवनात सतत अडथळे येत असल्यास महानवमीच्या दिवशी करा हे उपाय
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कोर्ट-कचेरीचं किंवा सरकारी काम असेल तर ते मार्गी लागेल. पैशाची गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे. कामाचा लोड थोडा जास्त असेल पण काळजी करू नका, मेहनतीचं फळ नक्की मिळेल. एकट्याने काम न करता सहकार्यांची मदत घ्या. घरात पॉझिटिव्ह वातावरण असेल.
नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. मेहनत थोडी जास्त करावी लागेल पण त्याला पर्याय नाही. जास्त विचार करणं सोडून द्या आणि जे काम आहे ते प्रामाणिकपणे करा. कोणालाही वाईट बोलू नका. संयम ठेवला तर तुमची वेळ नक्की येणार आहे. आर्थिक स्थिती ठीक आहे आणि पुढे अजून सुधारेल.आज 20 ऑक्टोबर 2026, मंगळवार आणि आजचा दिवस खूप खास आहे. आज दसरा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा दिवस.
याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करत वाईट शक्तीचा नाश केला. आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यासाठी एकदम उत्तम आहे.आज ग्रहांची स्थिती पण जबरदस्त आहे. चंद्रावर मंगळ आणि गुरुची सातवी दृष्टी पडत आहे. त्यामुळे आज लक्ष्मी योग आणि गजकेसरी योग दोन्ही तयार होत आहेत. या योगाचा परिणाम सगळ्याच मूलांकावर होणार आहे. चला तर मग पाहूया, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा जाणार आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)