फोटो सौजन्य- pinterest
ऑक्टोबरचा महिना हिंदू धर्मामध्ये सण उत्सवांसाठी विशेष मानला जातो. हा सण केवळ आनंद आणि उत्साहाचा नसून धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. पंचांगानुसार या ऑक्टोबर महिन्यात एकापाठोपाठ एक एक सण आणि व्रत आहे. जो कुटुंबामध्ये सामाजिक जीवनात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा असते. ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सणउत्सवांची यादी जाणून घ्या
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला दसर्याचा सण साजरा केला जातो. शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर हा सण येतो. या दिवशी श्री रामाने रावणाचा वध केला होता. या दिवशी शास्त्राची पूजा केली जाते.
या एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते.
शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शनि प्रदोष व्रत म्हटले जाते.
अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला ही पौर्णिमा असते. यालाच शरद पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असते.
हिंदू धर्मामध्ये धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे. या दिवसापासून पाच दिवस चालणाऱ्या दिवाळीची सुरुवात होते. हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यातील कृष्ण शुक्ल पक्षातील तिथीला साजरी केली जाते. हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते.
दिवाळीतील पाडव्याचा सण देखील महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.
2 ऑक्टोबर रोजी बुधाचे कन्या राशीत संक्रमण
3 ऑक्टोबर रोजी बुधाचे तुळ राशीत संक्रमण
9 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाचे कन्या राशीत संक्रमण
17 ऑक्टोबर रोजी सूर्याचे तुळ राशीत संक्रमण
19 ऑक्टोबर रोजी बृहस्पतीचे कर्क राशीमध्ये संक्रमण
24 ऑक्टोबर रोजी बुधाचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण
27 ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचे वृश्चिक राशीमध्ये संक्रमण
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)