फोटो सौजन्य- pinterest
शारदीय नवरात्रीमधील नवमी म्हणजे शेवटचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी नवरात्रीचे समापन होते. यालाच महानवमी असे म्हटले जाते. काही लोक महानवमीच्या वेळी कन्या पूजन आणि होम हवन करतात. जे लोक अष्टमीला व्रत पाळतात ते नवमीला पारण करतात. यावेळी महानवमी बुधवार, 1ऑक्टोबर रोजी आहे.
देवीचे नववे रूप सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे. देवीच्या पूजेमध्ये सर्व सिद्धितांचे आशीर्वाद मिळतात. या देवीची पूजा केल्याने ज्ञान, बुद्धी, मोक्ष याची प्राप्ती होते. पंचांगानुसार, अश्विन शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीची सुरुवात 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी सुरू होईल आणि 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार 1 ऑक्टोबर रोजी नवमी पूजन, कन्या पूजन आणि होम हवन केले जाईल. सिद्धिदात्री देवीची पूजा करण्याची पद्धत, मंत्र आणि महत्त्व जाणून घ्या
1 ऑक्टोबर रोजी सकाळचा मुहूर्त 6 ते 10 असेल तर दुपारचा मुहूर्त 12 ते 3 असेल. संध्याकळी आरती करण्याची वेळ 6.30 ते 8, होम हवन करण्याचा मुहूर्त सकाळी 6.14 ते सायंकाळी 6.7 पर्यंत असेल. कन्या पूजन करण्याचा मुहूर्त 5.1 ते 6.14 आणि दुपारी 2.9 ते 2.57 पर्यंत आहे.
देवीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर हातामध्ये फूल, पाणी आणि तांदूळ घेऊन देवीची आराधना करा. त्यानंतर देवीच्या मूर्तीची स्थापना करून तिला गंगाजलाने शुद्ध करून पूजेची सुरुवात करा. त्यानंतर देवीला सिंदूर, कुंकू, लाल वस्त्र, फूल, तांदूळ, सुपारी, श्रृंगाराच्या वस्तू आणि नैवेद्य देवीला अर्पण करा. नंतर मंत्रांचा जप करा.
सिद्धिदात्री देवीला नवमीच्या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. यासोबतच हलवा, पुरी आणि काळे चण्याचा देखील नैवेद्य दाखवू शकतात.
नवरात्रीमधील देवीचे नववे रूप सिद्धिदात्री देवीचे आहे. तिच्या चार हातात भुजा आहे. तिच्या एका हातात गदा तर दुसऱ्या हातात चक्र आहे. तर तिसऱ्या हातात कमळ आणि चौथ्या हातात शंख आहे. ही देवी सिंहावर स्वार आहे.
देवी सिद्धिदात्रीला आठ सिद्धी आणि नऊ निधींची दाता मानले जाते. शास्त्रांनुसार, देवीच्या या रूपाला चार हात आहेत, ज्यामध्ये ती गदा, चक्र, शंख आणि कमळ हे तिच्या हातामध्ये आहे. तिची पूजा केल्याने भक्ताला आत्मविश्वास, यश, आध्यात्मिक प्रगती आणि जीवनात सौभाग्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)