Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palmistry: तळहातावरील दुहेरी मस्तिष्क रेषा काय दर्शवते? करिअर आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्या

हस्तरेखाशास्त्रानुसार, मस्तिष्क रेषा ही विचार करण्याची पद्धत, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यांच्याशी संबंधित आहे. दुहेरी मस्तिष्क रेषा असलेली व्यक्ती दुर्मिळ असते, जे तिच्या अत्यंत बुद्धिमत्तेचे द्योतक आहे. अशा व्यक्ती बहुतेक क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतात. दुहेरी मस्तिष्क रेषा काय दर्शवते ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • तळहातावरील दुहेरी मस्तिष्क रेषा काय दर्शवते
  • हस्तरेषाशास्त्रानुसार ही रेषा तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि विश्लेषणक्षम विचारांचे प्रतीक मानली जाते
  • एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने सांभाळण्याची क्षमता असल्याची धारणा आहे
 

हस्तरेखाशास्त्रानुसार तळहातावरील प्रत्येक रेषेचे स्वतःचे महत्त्व आहे. यापैकी एक म्हणजे मस्तक रेषा, जी व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची पद्धत, स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि मानसिक संतुलन यांच्याशी संबंधित आहे. हस्तरेखाशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर दोन वेगळ्या बुद्धीरेषा असणे हे एक दुर्मिळ लक्षण मानले जाते. दुहेरी बुद्धीरेषा हे दर्शवते की त्या व्यक्तीमध्ये दोन प्रबळ मानसिक बाजू आहेत. यातील एक बाजू व्यावहारिक, तल्लख आणि तार्किक असू शकते. दुसरी बाजू सृजनशील, भावनिक, अंतर्ज्ञानी किंवा साहसी असू शकते. यामुळे व्यक्ती अधिक लवचिक तर बनतेच, पण त्याचबरोबर मानसिकदृष्ट्याही अधिक सक्रिय होते. तळहातावरील दुहेरी मस्तिष्क रेषा काय दर्शवते ते जाणून घ्या

दुहेरी मस्तिष्क रेषा म्हणजे काय

ज्यावेळी तळहातावर सामान्य मस्तिष्क रेषेला समांतर अशी दुसरी स्पष्ट रेषा दिसते, तेव्हा तिला दुहेरी मस्तिष्क रेषा म्हणतात. हे संयोजन तेव्हाच प्रभावी मानले जाते, जेव्हा दोन्ही रेषा स्पष्ट, खोल आणि सुस्पष्ट असतील. जर दोन्ही रेषा स्पष्ट असतील, तर त्या व्यक्तीमध्ये उच्च मानसिक क्षमता असू शकते. ते गोष्टी एकापेक्षा जास्त दृष्टिकोनातून पाहू शकतात. ते तथ्य आणि भावना दोन्ही समजू शकतात. असे लोक बाहेरून शांत दिसू शकतात, पण त्यांचे मन आतून खूप व्यस्त असू शकते.

Palmistry: तळहातावरील राहू पर्वतामुळे बदलू शकते नशीब; जाणून घ्या शुभ अशुभ परिणाम

तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि दुहेरी विचारसरणी

हस्तरेखाशास्त्रानुसार अशा रेषा असलेल्या लोकांमध्ये अनेकदा तीक्ष्ण बुद्धी, सखोल आकलनशक्ती आणि विविध परिस्थितींकडे अनेक दृष्टिकोनांतून पाहण्याची क्षमता असते. त्यांच्यामध्ये व्यावहारिक विचार आणि सर्जनशीलता यांचा चांगला समतोलही असू शकतो.

तर्क आणि कल्पनाशक्ती

असे मानले जाते की, एक मस्तिका रेषा व्यक्तीच्या तार्किक आणि व्यावहारिक विचारांचे प्रतिनिधित्व करते, तर दुसरी रेषा कल्पनाशक्ती, अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलता दर्शवते. अशा व्यक्ती कला, लेखन, शिक्षण, व्यवसाय, डिझाइन, मीडिया, समुपदेशन किंवा नेतृत्व यांसारख्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.

निर्णय घेण्याची क्षमता

दुहेरी मस्तिका रेषा असलेले लोक घाईचे निर्णय घेत नाहीत. ते प्रत्येक पैलूचा काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये नेतृत्व आणि धोरणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होऊ शकते. असे निर्णय घेतल्याने त्यांचे भविष्य मजबूत होते आणि लवकरच ते कुटुंबातील सर्व निर्णय स्वतःहून घेऊ लागतात.

सापासारखी दिसणारी ‘ही’ रेषा तुमच्या हातावर आहे का? नशिबाचे भोग पालटणार? मग काय सांगते हस्तरेखा शास्त्र?

जास्त विचार करण्याची सवय

हस्तरेखाशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या हातावर अशा रेषा असतात, ते अनेकदा जास्त विचार करतात. जर दोन्ही रेषांवर कापल्यासारख्या खुणा, साखळीसारख्या खुणा किंवा खंड असतील, तर त्यामुळे मानसिक गोंधळ किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. अशा व्यक्तींसाठी नियमित दिनचर्या, पुरेशी विश्रांती आणि मानसिक संतुलन राखणे फायदेशीर मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तळहातावरील दुहेरी मस्तिष्क रेषा म्हणजे काय?

    Ans: हस्तरेषाशास्त्रानुसार मस्तिष्क रेषेजवळ आणखी एक समांतर रेषा दिसत असल्यास तिला दुहेरी मस्तिष्क रेषा (Double Head Line) असे म्हटले जाते.

  • Que: दुहेरी मस्तिष्क रेषा असणे शुभ मानले जाते का?

    Ans: पारंपरिक हस्तरेषाशास्त्रानुसार ही रेषा बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि बहुआयामी विचारसरणीचे प्रतीक मानली जाते. मात्र याचे अर्थ इतर हस्तरेषांवरही अवलंबून असतात

  • Que: दुहेरी मस्तिष्क रेषा असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व कसे असते?

    Ans: अशा व्यक्ती बुद्धिमान, विश्लेषणात्मक, आत्मविश्वासू आणि समस्या सोडवण्यात कुशल असतात, अशी धारणा आहे.

Web Title: Palmistry what does the double brain line on the palm indicate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
1

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
2

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.