फोटो सौजन्य- istock
आजचा रविवारचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज चंद्राचे संक्रमण सिंह राशीत दिवसरात्र होणार आहे. आज सर्व राशीच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. चंद्र आणि मंगळ यांची युती सिंह राशीत होत असल्याने धन लक्ष्मी योग तयार होईल. गुरु आणि शुक्र मिथुन राशीत असल्याने महालक्ष्मी योग तयार होईल. रविवारी रवि योगाचा चांगला संयोग होणार आहे. सूर्य देवाच्या आशीर्वादाने आणि आणि रवि योगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. काही राशीच्या लोकांना संबंधित क्षेत्रात कमाईच्या नवीन संधी मिळतील. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्या जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस खूप चांगला असणार आहे. मेष राशीच्या लोकांनी आधी केलेल्या योजनेचा फायदा होणार आहे. जर तुमचे कोणतेही काम अडकलेले असतील तर ते पूर्ण होतील. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करु शकता. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणार आहे. तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन लोकांचा पाठिंबा मिळेल. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करत असल्यास त्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. रेस्टॉरंट्स, पब, हॉटेल्स इत्यादींमध्ये काम करणाऱ्यांना लोकांना आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस चांगला राहणार नाही. तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले जाईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. जर तुम्ही राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. ग्राहकांच्या मदतीने व्यवसायात मोठी रक्कम मिळू शकते. तुम्हाला घेतलेल्या मेहनतीचे अपेक्षित लाभ मिळेल. तुम्हाला तुमच्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण चांगले राहील. तुमच्या जोडीदारामध्ये मतभेद होऊ शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस खूप फायदेशीर राहील. तुम्हाला कोणत्याही कामामध्ये कुटुंबाकडून अपेक्षित पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये भागीदारांना पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळवून देऊ शकतो. जर तुम्ही भागीदारीमध्ये तुम्ही व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नात्यांमध्ये गोडवा राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)