फोटो सौजन्य- istock
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे. या दिवशी नागाची आणि महादेवाची पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होतो, अशी देखील मान्यता आहे. आर्थिक लाभासाठी नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, जाणून घ्या
पंचांगानुसार नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते. यावेळी पंचमीची सुरुवात सोमवार, 28 जुलै रोजी रात्री 11.24 वाजता होणार आहे आणि पंचमीची समाप्ती बुधवार, 30 जुलै रोजी पहाटे 12.46 वाजता होईल. त्यामुळे यावेळी नागपंचमीचा सण मंगळवार 29 जुलै रोजी सर्वत्र साजरा करण्यात येईल.
असे मानले जाते की, नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर दही अर्पण केल्याने समृद्धी येते. दही अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, महादेवाच्या आशीर्वादाने पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते.
महादेवांना मध खूप आवडते, असे म्हटले जाते. या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते आणि कर्जाच्या समस्येपासूनही मुक्तता मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
धार्मिक मान्यतेनुसार महादेवांना गंगाजल अर्पण केल्याने व्यक्तीला मानसिक शांती मिळते. असे मानले जाते की, शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
नागपंचमीच्या दिवशी नागाची आणि महादेवाची पूजा करताना काळे तीळ अर्पण करावे. शास्त्रामध्ये म्हटल्यानुसार काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे. अशा वेळी नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाला काळे तीळ अर्पण केल्याने आर्थिक प्रगतीसह जीवनातील अनेक अडथळे दूर होतात.
महादेवांना गाईचे तूप खूप आवडते. नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर गाईचे तूप अर्पण केल्याने आजारांपासून मुक्तता होते आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. धार्मिक श्रद्धेनुसार असे केल्याने तुमची कर्जातून मुक्तता होते.
नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगाला उसाचा रस अर्पण करणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)