फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 29 सप्टेंबरचा दिवस विशेष असणार आहे. आज नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी तिथी आहे. आजचा हा दिवस कालरात्री देवीला समर्पित आहे. चंद्र गुरु राशीच्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या सातव्या राशीत असल्याने गजकेसरी राजयोग तयार होईल. तर मूल नक्षत्राच्या संयोगाने सर्वार्थ सिद्धि योग, रवि योग आणि सौभाग्य योग हे शुभ योग तयार होणार आहेत. देवी कालरात्रीच्या आशीर्वादाने आणि शुभ संयोगामुळे मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. आजचा सोमवारचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी या काळात नशिबाची साथ लाभेल. तुमचे गमावलेले पैसे परत मिळू शकतात. तुमची काम करण्याची वृत्ती वाढेल आणि तुमच्या योजनांचे फळ मिळेल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद राहील. सरकारी कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही व्यवसायामध्ये भरपूर पैसे कमावू शकता. तुम्हाला परदेशातूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कपडे आणि विलासिता प्रदान करण्याची संधी निर्माण करत आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला खर्चावर नियंत्रित ठेवावे. अनावश्यक खर्च करणे टाळावे. या काळात तुम्हाला नशिाबाची साथ लाभेल. रखडलेल्या आर्थिक योजना या काळात वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.
धनु राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. तुम्ही महत्त्वाचे निर्णय अचूकपणे घ्याल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला परदेशी स्रोतांकडूनही फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला काहीतरी नवीन आणि सर्जनशील करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा आणि आदर मिळेल. तसेच तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना आज सकारात्मक बातम्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित फायदे होतील. कौटुंबिक व्यवसायांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)