फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस खास असणार आहे. आज अंक 2 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. अशावेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आजच्या सोमवारचा दिवसाचा स्वमी चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांना जास्त राग करणे टाळावे आणि कोणत्याही गोष्टी शांतपणे हाताळावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा मिश्रित राहील. घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन केले जाते. जर तुमचे कोणासोबत वाद असतील तर ते दूर होतील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणत्याही गोष्टीवरून वाद घालणे टाळावे. नाहीतर समस्यांचा सामना करावा लागेल. एखाद्या गोष्टीवरून शांत राहणे चांगले राहील. कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवाल.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. जर ते तुमच्यावर नाराज असतील तर एखादी भेटवस्तू द्या. त्यामुळे त्याचे मन प्रसन्न होईल आणि तुम्ही आनंदी रहाल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कामाचा जास्त ताण जास्त राहू शकतो. कुटुंबाच्या गरजेकडे लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराची साथ मिळेल.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. घरगुती काम करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. सामाजिक कार्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही जास्त व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्या. शरीराशी संबंधित आजार उदभवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध रहावे लागेल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या सकारात्मक विचाराने नवीन योजना आखू शकतात. काही बाबतीत तुम्हाला मित्रांचा पाठिंबा मिळेल ज्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. काही गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. तसेच तुम्ही केलेल्या नियोजनात तुम्ही व्यस्त राहाल. कुटुंबासोबत तुमचे नाते अधिक दृढ राहील. तुमच्या जोडीदाराचा विश्वास संपादन कराल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही लोक तुमच्या जोडीदाराशी वाद घालू शकतात. तुमच्या रागावर आणि वादावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस सामान्य राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)