फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 27 सप्टेंबरचा दिवस आजच्या दिवसाचा अधिपती ग्रह शनि आहे. आज नवरात्रीमधील पंचमी तिथी आहे त्यामुळे आजचा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत संक्रमण करेल आणि गुरु ग्रह चंद्रापासून आठव्या घरामध्ये संक्रमण करणार आहे. सूर्य चंद्रापासून अकराव्या घरात असल्याने बुधादित्य योग तयार होईल. बुध त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये असल्याने बुधादित्य योग तयार होईल. तसेच अनुराधा नक्षत्रामुळे सर्वार्थ सिद्धि योग आणि प्रीती योगासह इतर अनेक शुभ योग तयार होणार आहेत. स्कंदमातेच्या आशीर्वादाने आणि राजयोगाच्या प्रभावामुळे आज वृषभ, मिथुन, तूळ, धनु आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. स्कंदमाता देवीच्या आशीर्वादाने कोणत्या राशीच्या उत्पन्नात वाढ होईल, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीची योजना आखू शकता. तुम्हाला एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कपडे आणि सजावटीशी संबंधित लोकांना आज चांगले उत्पन्न मिळतील. किराणा व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी समन्वय राखू शकाल. मित्राची मदत देखील तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला परदेशी स्रोतांकडूनही फायदा होऊ शकतो. अभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुम्ही वाहनाची खरेदी करु शकता.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तसेच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असल्यास ते परत मिळू शकतात. व्यवसायासाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला आज आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. वाहन आणि कापड व्यवसायांना आज कमी उत्पन्न मिळू शकते. जर तुमची इच्छा असल्यास तुम्ही नवीन कामाची सुरुवात करु शकता.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक फायदे देखील होऊ शकतात. तुम्हाला भेटवस्तू आणि कपडे मिळू शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुमच्या सासरच्या लोकांकडून लाभ मिळू शकतात. बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांकडूनही सहकार्य मिळू शकेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या सर्व इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)