• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Skanda Sashti 2025 Follow These Remedies To Get Rid Of Mangal Dosha

Skanda Sashti 2025: मंगळ दोषाचा त्रास होत असल्यास स्कंद षष्ठीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमचे त्रास होतील दूर

स्कंद षष्ठीचे व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी पाळले जाते. ज्यांना मंगळ दोषाचा त्रास आहे त्यांनी स्कंद षष्ठीच्या दिवशी उपाय करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. स्कंद षष्ठीला कोणते उपाय करायचे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 27, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मामध्ये स्कंद षष्ठीचा सण भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी हे व्रत पाळले जाते. हा दिवस केवळ भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय यांच्या पूजेसाठीच खास मानला जात नाही तर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे त्यांच्यासाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. मंगळाच्या नकारात्मक प्रभावांना आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासांना दूर करण्यासाठी स्कंद षष्ठीचा दिवस खूप फायदेशीर मानला जातो.

स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी तिथीची सुरुवात 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12.3 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार हे व्रत शनिवार, 27 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्तीला त्याचे फायदे होतात.

स्कंद षष्ठी आणि मंगळ दोष यांच्यातील संबंध काय आहे

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान कार्तिकेय यांना देवांचा सेनापती म्हटले जाते आणि त्यांना मंगळ ग्रहाचे अधिपती देवता मानले जाते. म्हणजेच ज्यांचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असतो अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येतात, वैवाहिक जीवनात संघर्ष होतात, कर्ज आणि आरोग्याशी संबंधित समस्या कायम राहतात. या दिवशी भगवान कार्तिकेयशी विधीनुसार पूजा आणि उपाय केल्याने मंगळाचे दोष शांत होतात आणि जीवनातील त्रास दूर होतो, असे मानले जाते.

मंगळ दोष दूर करण्यासाठी स्कंद षष्ठीला करा हे उपाय

भगवान कार्तिकेय यांची विशेष पूजा

स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर भगवान कार्तिकेयची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. त्यांना लाल फुले, विशेषतः गुलाबाचे फूल अर्पण करा. त्यानंतर पूजेदरम्यान त्यांना कापूर, सिंदूर आणि रोली अर्पण करा. पूजा झाल्यानंतर खीर किंवा मिठाई याचा नैवेद्य दाखवा.

Navratri 2025: नवरात्रीमध्ये जास्वंदाच्या फुलांचे करा ‘हे’ उपाय, संपत्ती आणि समृद्धीची कधीही भासणार नाही कमतरता

स्कंद षष्ठी स्तोत्राचे पठण

स्कंद षष्ठीच्या दिवशी स्तोत्राचे पठण केल्याने मंगळाच्या दुष्परिणामांपासून सुटका होणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. पूर्ण भक्तीने या स्तोत्राचे पठण केल्याने मंगळामुळे होणारे सर्व दुःख दूर होतात. याशिवाय ओम तत्पुरुषाय विद्महे महासेनया धीमहि तन्नो स्कंधः प्रचोदयात या मंत्रांचा जप करता येऊ शकतो.

या गोष्टींचे करा दान

मंगळ ग्रहाचा रंग लाल असल्यामुळे या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला लाल डाळ, गूळ, तांबे आणि लाल कपडे या गोष्टींचे दान करावे. यामुळे मंगळ शांत होईल आणि अशुभ प्रभाव कमी होईल.

Skanda Sashti 2025: स्कंद षष्ठीला घडणार दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या मुहू्र्त आणि शुभ योग

या पद्धतीने करा अभिषेक

गुळ मिसळलेल्या पाण्याने कार्तिकेयेचा अभिषेक करावा. मंगळ दोषामुळे उद्भवणाऱ्या मालमत्तेचे वाद आणि कर्जाच्या समस्या सोडवण्यासाठी हा उपाय करणे खूप उपयुक्त ठरतो.

असे मानले जाते की, स्कंद षष्ठीच्या दिवशी हे उपाय केल्याने दोषामुळे निर्माण होणारे सर्व अडथळे, विशेषतः विवाह आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Skanda sashti 2025 follow these remedies to get rid of mangal dosha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
1

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
2

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Vinayaka Chaturthi 2026: फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
3

Vinayaka Chaturthi 2026: फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Astro Tips: भाड्याच्या घरातही होईल पैशांची भरभराट; ‘ही’ झाडे लावल्याने पैशांची तंगी होईल दूर
4

Astro Tips: भाड्याच्या घरातही होईल पैशांची भरभराट; ‘ही’ झाडे लावल्याने पैशांची तंगी होईल दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

Feb 16, 2026 | 02:12 PM
शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

Feb 16, 2026 | 02:02 PM
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

Feb 16, 2026 | 01:55 PM
सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

Feb 16, 2026 | 01:50 PM
T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा! ऑस्ट्रेलियन संघात सामील, आयसीसीने केली पुष्टी

T20 World Cup मध्ये वेगवान गोलंदाजाची स्टीव्ह स्मिथने घेतली जागा! ऑस्ट्रेलियन संघात सामील, आयसीसीने केली पुष्टी

Feb 16, 2026 | 01:31 PM
Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

Feb 16, 2026 | 01:29 PM
Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत

Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत

Feb 16, 2026 | 01:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.