फोटो सौजन्य- pinterest
बुधवार 18 जन रोजी पूर्ववाद्रपद नक्षत्र असल्यामुळे राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. यावेळी सकाळी 7. 40 वाजता प्रीती योग सुरू झालेला आहे. त्यानंतर आयुष्यमान योग सुरू होणार आहे या योगाचा आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी हा योग शुभ मानला जातो. यानंतर बव करण योग दुपारी 1. 34 वाजल्यापासून सुरू होणार आहे. यानंतर बालव करण योग तयार होईल त्यामुळे सामान्य कार्य होईल.
ग्रहांच्या स्थितीनुसार चंद्र संध्याकाळी 6.35 वाजेपर्यंत कुंभराशीतत आहे त्यानंतर मीन राशीमध्ये प्रवेश करेल. या ठिकाणी शनि पहिल्यापासून उपस्थित आहे. राहू ग्रह कुंभ राशीमध्ये तर शनि मीन राशीत असल्याने भावनिक आणि अस्थिरता निर्माण होऊ शकते. मिथुन राशीत बुध, सूर्य आणि गुरु यांचा त्रिग्रही योग आहे. मेषमध्ये शुक्र, सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतू ग्रहाच्या युतीमुळे काही राशींना समस्येचा सामना करावा लागेल. कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल जाणून घ्या
आज 18 मे रोजी शुक्र आपल्या राशी मध्ये असेल. चंद्र राहूच्या कुंभ राशीमध्ये आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत थांबतील, सामाजिक कार्यात तणाव येऊ शकतो. तसेच मंगळ आणि केतूच्या युतीमुळे परिवारामध्ये मतभेद होणे, आईच्या तब्येतीची चिंता आणि मालमत्ता यासंबंधित समस्या भेडसावू शकतात.
मिथुन राशीत बुध, सूर्य आणि गुरु यांचा त्रिग्रही योग आहे. यामुळे मानसिक तणाव, आत्मविश्वास किंवा कोणतेही निर्णय घेताना अडथळे येणे. चंद्र आणि राहूच्या संक्रमणामुळे अडथळा, प्रवासात येणाऱ्या समस्या आणि धार्मिक कार्यांमध्ये अडथळा निर्माण होणे.
मंगळ आणि केतू ग्रहाची युक्ती तुमच्या राशीमध्ये असल्याने राग येणे, घाईमध्ये कोणतेही निर्णय घेणे, अपघात होणे यांसारख्या घटना घडू शकतात. चंद्र आणि राहू कुंभ राशीत असल्यामुळे तुमच्या जोडीदार किंवा व्यवसायातील भागीदार व्यक्तींसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. यामुळे नात्यात तणाव येणे, एखादी डिल करताना त्यात अडथळा येणे अशा घटना घडू शकतात.
आज चंद्राचा प्रभाव तूळ राशीच्या लोकांवर राहील. हे लोक आज तणावामध्ये राहू शकतात. आर्थिक अडचणी भेडसावू शकतात. मित्र परिवार, नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. पूर्वा भाद्रपद नक्षत्रामुळे मानसिक अस्थिरता जाणवू शकते.
चंद्र राहूचा परिणाम वृश्चिक राशीच्या लोकांवर होऊ शकतो. तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मालमत्ते संबंधित समस्या उद्भवू शकतात. काही लोकांना करिअरमध्ये अडथळा येऊ शकतो. सहकाऱ्यांसोबत तणावाचे वातावरण राहू शकते.
चंद्र आणि राहू कुंभ राशीत असल्याने आर्थिक समस्या, संवादात गैरसमज किंवा कुटुंबात तणाव जाणवू शकतो. यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. आरोग्यात चढ उतार जाणवू शकतो. पूर्वा भाद्रपद नक्षत्रात कोणतेही निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल.
कुंभ राशीच्या लोकांना आज मानसिक ताण, डोकेदुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चंद्र मीन राशीत असल्यामुळे अस्थिरता वाढू शकते. व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत असल्यास तणाव जाणवू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)