तीन ग्रह होणार एकत्र वक्री (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
जुलै महिना संपूर्ण जगात उत्पात करणार असल्याचे आता ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात सांगण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्रात ९ ग्रह आणि २७ नक्षत्रांचा उल्लेख आहे. परंतु आधुनिक ज्योतिषशास्त्रात नेपच्यून ग्रहालाही महत्त्व देण्यात आले आहे. जुलै २०२५ मध्ये नेपच्यून ग्रहाच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे. इतकेच नाही तर इतर ५ ग्रहांच्या स्थितीमुळे खूप उलथापालथ होणार आहे.
यामध्ये शनि, बुध, गुरु आणि राहू-केतू यांचा समावेश आहे. शनि वक्री होणार असून नक्की काय आणि कोणत्या राशीवर याचा परिणाम होणार आहे याबाबत ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी सांगितले आहे. तुम्ही जुलै महिन्यात स्वतःला सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. याचा संपूर्ण जगावर परिणाम होणार असून सगळीकडे उत्पात होणार असल्याचे संकेत ज्योतिषशास्त्राकडून देण्यात येत आहेत (फोटो सौजन्य – iStock)
एकाच वेळी तीन ग्रह वक्री
नेपच्यून ग्रहदेखील होणार वक्री
जुलै महिन्यात शनि, बुध आणि नेपच्यून हे वक्री होणार आहेत. न्यायाची देवता असलेला शनि १३ जुलै २०२५ ते २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वक्री असेल. १८ जुलैपासून बुध देखील वक्री होईल. याआधी ५ जुलै रोजी नेपच्यून वक्री होईल. इतकेच नाही तर, गोचर गुरु मिथुन राशीत अस्त झाला आहे आणि जुलैच्या सुरुवातीलाही अस्त राहील. या सगळ्या वक्री ग्रहांचा नक्की कोणावर आणि कसा परिणाम होणार आहे याबाबत माहिती या लेखातून आम्ही देत आहोत.
Zodiac Sign: या राशीच्या लोकांचे आजपासून वाईट दिवस संपतील, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश
राहू-केतू
राहू-केतू वक्री असल्याचा त्रास
दुसरीकडे, राहू आणि केतू नेहमीच वक्र गतीने हालचाल करतात अर्थात नेहमीच वक्री असतात. जुलैमध्ये राहू आणि केतूदेखील एक अशुभ संयोग तयार करत आहेत. मंगळ आणि केतूची संयोग आधीच तयार झाली आहे, जी जुलैमध्ये काही काळ राहील आणि यामुळेच जगावर कहर करेल. सध्या सगळीकडे या ग्रहांमुळे हाहाःकार माजला असून अनेक ठिकाणी मृत्यूचे तांडव सुरू असलेले दिसून येत आहे आणि जुलै महिन्यात याचा कहर होण्याची शक्यता आहे.
आग, वादळाचे तांडव
नैसर्गिक आपत्तीने होणार जग हैराण
ग्रहांच्या स्थितीतील हा बदल देश आणि जगासाठी चांगला आहे असे म्हणता येणार नाही. तर जगात सगळीकडे या ग्रहांच्या बदलाने खूपच मोठा बदल होणार आहे आणि हा बदल त्रासदायक ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या ग्रहांच्या स्थितीमुळे आपत्ती, आग, वादळ, अपघात होऊ शकतात. कारण प्रतिगामी ग्रह सहसा अशुभ परिणाम देतात. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने स्वतःची काळजी घ्यायला हवी तर अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकत असल्याचा इशाराही ज्योतिषांनी दिला आहे. घाबरून न जाता भविष्यात येणाऱ्या त्रासाला कसे सामोर जायचे यासाठी हा इशारा असून यावर योग्य विचार करावा असंही मणेरीकर यांनी सांगितले आहे.
Panchak: आजपासून पंचकाची सुरुवात, यावेळी चुकूनही करु नका ही काम
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.