फोटो सौजन्य- istock
2025 मधील आठवा महिना म्हणजे ऑगस्ट सुरु झाला आहे. या महिन्याला धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्व आहे. यावेळी ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी यांसारखे प्रमुख सण येत आहे. या सणांच्या वेळी ग्रह आपल्या राशी बदलणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार अनेक प्रमुख ग्रह ऑगस्ट महिन्यात आपल्या राशी बदलणार आहे. या बदलांचा परिणाम बुध, सूर्य, शुक्र या ग्रहांचा समावेश असेल. त्यादरम्यान अनेक ग्रह त्यांचे नक्षत्र देखील बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या प्रमुख घटना मानल्या जातात. ग्रहांच्या या हालचालींचा परिणाम लोकांच्या वैयक्तिक जीवनावर होऊ शकतो.
या काळामध्ये काही राशींच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जसे की, प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते, तर काही लोकांचे काम बिघडू शकते. तसेच काही लोकांच्या आरोग्य आणि नेतृत्व क्षमतेवरही याचा परिणाम होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात ग्रहांच्या होणाऱ्या हालचालींचा कोणत्या राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार शनिवार, 9 ऑगस्ट रोजी कर्क राशीमध्ये उद्य होईल त्यानंतर तो 11 ऑगस्ट रोजी त्याच म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर ग्रहांचा राजा सूर्य देखील राशी बदलेल. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी कर्क राशीमधून निघून तो सिंह राशीत आपले संक्रमण करेल. नंतर 21 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह देखील आपली राशी बदलणार आहे. शुक्र ग्रहाला आनंद आणि सौभाग्याचा कारक मानले जाते.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी बुध ग्रह कर्क राशीमध्ये अस्त करेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. ग्रहांचे हे संक्रमण ऑगस्ट महिन्यात ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे मानले जाते. तर चंद्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. यावेळी राहू ग्रह आधीच तिथे उपस्थित असल्याने कुंभ राशीमध्ये ग्रहण योग तयार होईल. ऑगस्ट महिन्यात गुरुदेव मिथुन राशीत, मंगळ कन्या राशीत आणि शनि मीन राशीत संक्रमण करेल.
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. या काळामध्ये व्यवसायात घेतलेले निर्णय यशस्वी होतील. त्यासोबत तुमच्या धार्मिक यात्रा यशस्वी होतील आणि तुमचे नातेसंबंध सुधारतील.
या काळामध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. तसेच आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे मानसिक ताण जाणवू शकतो. जर तुम्ही बाहेर फिरायला जायचा विचार करत असाल तर तो अयशस्वी होऊ शकतो.
या काळामध्ये मिथुन राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. सध्या वाहन खरेदी करणे टाळावे.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. या काळामध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच तुम्हाला काही नवीन आव्हानांनाही तोंड द्यावे लागू शकते. दरम्यान, तुम्हाला व्यवसाय, प्रवास, लग्न इत्यादींशी संबंधित निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावे लागतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप खास राहणार आहे. सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास आणि आदर दोन्ही वाढेल. त्यासोबतच तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करु शकता.
कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा आता चांगली राहील. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होईल. तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. या काळात नोकरी करणारे लोक त्यांच्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतील.
या काळामध्ये तूळ राशीच्या लोकांना इच्छित नोकरी मिळू शकते. आरोग्याबाबत निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. गुंतवणूक करण्यासाठी आता वाट पहा अन्यथा आर्थिक नुकसान होईल.
या काळामध्ये तुम्हाला कुटुंबाकडून चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला संयम बाळगावा लागेल. ज्यामुळे तुमच्या अर्ध्याहून अधिक समस्या स्वतःहून संपतील.
धनु राशीच्या लोकांनी या काळामध्ये प्रवास करणे टाळावा. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला शारीरिक वेदना होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. या काळामध्ये लग्नात येणारे अडथळे दूर होतील. यावेळी तुम्ही वाहन खरेदी करु शकता. प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यावी.
कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. व्यवसायामध्ये येणारे सर्व अडथळे सहजपणे दूर होतील. कुटुंबात आनंद आणि शांती राहील. मित्र आणि खास लोकांकडून तुम्हाला आदर आणि सन्मान मिळू शकेल.
मीन राशीच्या लोकांना या काळामध्ये कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ न मिळाल्याने तुम्ही अस्वस्थ राहू शकता. तसेच तुम्हाला आर्थिक नियोजनात अडथळे येऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)