फोटो सौजन्य- pinterest
भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. त्या आपल्या भावांच्या कपाळावर टिळक लावतात, त्यांना मिठाई खाऊ घालतात आणि ओवाळले देखील जाते. यावेळी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या घरी जाते. मात्र एखाद्या वेळेस असे होते की, एखाद्या वेळी बहिणीला आपल्या भावाच्या घरी जाता येत नाही त्यामुळे राखी बांधली जात नाही किंवा काहींना भाऊ नसतो. जर बहिणीला राखी बांधता आली नाही तर काय होते ते जाणून घ्या
रक्षाबंधनाचा सणाला प्रेमाचा सण म्हणून मानले जाते. त्या दिवशी भावाला राखी बांधली नाही तर दोघेही एकमेकांच्या प्रेमापासून वंचित राहतात. तसेच प्रेमात लपलेले आशीर्वाद बहीण आणि भाऊ या दोघांसाठीही फायदेशीर असतात. असे म्हटले जाते की, आशीर्वाद संरक्षक कवचासारखे काम करतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांचा संबंध कुटुंबातील सदस्याशी संबंधित असतो. ज्याप्रमाणे सूर्याचा संबंध वडिलांशी आहे, चंद्राचा आईशी संबंधित आहे, तसा बुध ग्रहाचा संबंध बहीण, मामी इत्यादींशी संबंधित असल्याचे मानले जाते. रक्षाबंधनाला बहीण जेव्हा भावाला राखी बांधते त्यावेळी भावाच्या कुंडलीमधील बुध ग्रह देखील शुभ फळं देतो. जर काही कारणास्तव तुम्हाला राखी बांधली जात नसल किंवा तुमची बहीण तुमच्यावर नाराज असल्यास बुध ग्रहाचा वाईट परिणाम होतो. या वाईट परिणामांमुळे व्यक्तीच्या बोलण्यावर, बुद्धिमत्तेवर, तर्कशक्तीवर, व्यवसायावर, करिअरवर देखील नकारात्मक परिणाम होताना दिसून येतात.
जर बहिणीने भावाला राखी बांधली नाही किंवा काही कारणास्तव बांधता आली नाही तर बहिणीच्या कुंडलीमधील मंगळ ग्रह खराब होऊ शकतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, मंगळ ग्रहांचा संबंध धाकट्या भावाशी असतो. मंगळाला धैर्य आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. मंगळाचा अशुभ प्रभाव बहिणीच्या जीवनात होताना दिसून येतो.
ज्यांना भाऊ बहीण नाही त्या लोकांनी आपल्या आवडत्या देवाला राखी बांधावी. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळतील. यावेळी रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी शनिवार असल्याने या दिवशी हनुमानजींना राखी अर्पण करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)