
फोटो सौजन्य- pinterest
प्रदोष व्रत दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी येते. हे व्रत महादेव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे. डिसेंबर महिन्यात हे व्रत दोन वेळा पाळले जाते. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की हे व्रत पाळणाऱ्यांना सुख आणि समृद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात तर डिसेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे ते जाणून घ्या
पंचांगानुसार, त्रयोदशी तिथी 2 डिसेंबर रोजी दुपारी 3.57 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 3 डिसेंबर रोजी दुपारी 12.23 वाजता होईल. प्रदोष व्रताच्या नियमानुसार जेव्हा त्रयोदशी तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी प्रदोष व्रत पाळले जाते. यामुळे प्रदोष व्रत मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी मंगळवार असल्याने त्याला भौम प्रदोष व्रत असे म्हटले जाते.
मंगळवार, 2 डिसेंबर रोजी शुभ चौघडिया सायंकाळी 4.39 वाजता सुरू होणार आहे आणि सायंकाळी 6.2 वाजेपर्यंत असणार आहे. तर 2 डिसेंबर रोजी अमृत चौघडिया सायंकाळी 6.2 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 7.39 वाजेपर्यंत असेल.
या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे आणि उपवासाचे व्रत घ्यावे. यानंतर सूर्याला पाणी अर्पण करावे. संध्याकाळी पूजेची तयारी करुन घ्यावी. शिवमंदिरात जाऊन दूध आणि पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा. यानंतर, शिवलिंगावर बेलपत्र, फुले, धतुरा इत्यादी सर्व साहित्य अर्पण करा. यानंतर, महादेवाच्या मंत्रांचा जप करा आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करुन आणि त्यांची आरती करा. सर्वांना प्रसाद द्या.
प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे. जेव्हा हे व्रत मंगळवारी येते तेव्हा त्याला भौम प्रदोष म्हणतात. ‘भौम’ हा शब्द मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास करून आणि विधीनुसार पूजा केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांना सर्व दुःख आणि वेदनांपासून मुक्तता मिळते. या दिवशी भगवान शिव यांच्यासह भगवान हनुमानाच्या पूजेचे देखील विशेष महत्त्व आहे, जे शत्रूंवर विजय मिळविण्यास आणि अडथळे दूर करण्यास मदत करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: डिसेंबर महिन्यातील प्रदोष व्रत 2 डिसेंबर रोजी आहे
Ans: डिसेंबर महिन्यात 2 वेळा प्रदोष व्रत येते. पहिले शुक्ल पक्षात आणि दुसरे कृष्ण पक्षात
Ans: मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष व्रत असे म्हटले जाते