Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasantotsav 2026: वसंत ऋतू म्हणजे काय? हा उत्सव साजरा करण्यामागील काय आहे परंपरा

शिशिरातील पानगळतीनंतर नवपालवी, मोहोर आणि फुलांच्या उधळणीने निसर्गाला नवजीवन देणारा ऋतू म्हणजे वसंत. म्हणूनच त्याला ऋतुराज म्हटले जाते. वसंतोत्सव म्हणजे काय ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 04, 2026 | 12:41 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आजपासून वसंतोत्सवाची सुरुवात
  • वसंत ऋतू म्हणजे काय
  • वसंतोत्सव साजरा करण्यामागील परंपरा
 

 

वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंदसोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण, उत्सव साजरे करण्यासाठी निमित्तच शोधत असतो म्हणा ना! या काळात येणार्‍या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! वसंत म्हणजे शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा – त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा ऋतू. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रती-मदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. असा हा ऋतुराज वसंत आला आहे, तर हा निसर्गाचा सर्जनसोहळा आपणही मनात साठवू या आणि तितक्याच उत्साहाने साजराही करू या.

कधी असतो वसंतोत्सव

ही सगळी किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! वसंत म्हणजे शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा – त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा ऋतू, म्हणूनच तो सर्वकालीन सर्वप्रिय असावा. भारतासारख्या अतिविशाल देशात, नैसर्गिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ-फाल्गुन, काही ठिकाणी फाल्गुन-चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र-वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असे असले, तरीही सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसांनंतर, माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमीपासून वसंतोत्सव सुरू होतो, याला मान्यता असल्याचे दिसते.

Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ

यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव! अर्थात, या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची-विद्यांची देवी सरस्वती या देवतांचे महत्त्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वतीसुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असे मानतात. याच दिवसाला श्री पंचमी असेही म्हटले जाते, कारण श्री लक्ष्मीसुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंतोत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा केला जात असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र या ग्रंथातही येतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्टी करतात. नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी देवतांना वाहतात. देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळे वगैरे खाणे सुरू करतात. अर्थात नवान्नेष्टीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणार्‍या पिकांप्रमाणे व त्यांच्या उपलब्धीच्या वेळेप्रमाणे बदलतो.

ग्रंथांमध्ये उल्लेख

अगदी प्राचीन काळापासून कविमनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणार्‍या या वसंताची मोहक वर्णने अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यातही दिसतात. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मणग्रंथात तर या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुले, फळे येतात असे उल्लेख आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, “सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे (ऋतूनां कुसुमाकर:)” आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम तर सर्वांना माहीत आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सर्वच रचनांमध्ये वसंतातील निसर्गाची उधळण आणि वसंत व कामदेव या जोडगोळीने प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव या सर्व गोष्टींची वर्णने मोठ्या प्रमाणात येतात. विशेषत: रघुवंशमध्ये व कुमारसंभवात वसंतामुळे बदलेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरीत वर्णन सापडते.

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

याखेरीज याच काळाच्या थोडे आधी, नंतर होणारे उत्सव म्हणजे होलिकोत्सव वा होळी, फाल्गुनोत्सव, कुसुमायुध महोत्सव, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे उत्सव! वसंतोत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो, त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत व कालगणनेनुसार निरनिराळी नावे व दिवस असले, तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच असलेले दिसते. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखलसुद्धा एकमेकांवर उडवणे, पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे, मोठमोठ्या आवाजात बोलणे, एकमेकांना चिडवणे, गाणी म्हणणे, मिरवणुका काढणे अशा अनेक क्रीडांची वर्णने साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहे. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण व गोपी यांचे नाते खूप जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णने सर्वांच्याच परिचयाची! कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महा-रास आयोजित करीत असत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वसंत ऋतू म्हणजे काय?

    Ans: भारतीय ऋतूचक्रातील सहा ऋतूंमधील एक महत्त्वाचा ऋतू म्हणजे वसंत. शिशिरानंतर येणारा हा ऋतू निसर्गात नवपालवी, फुलांचा बहर आणि चैतन्य घेऊन येतो. त्यामुळेच वसंताला ‘ऋतुराज’ असे म्हटले जाते.

  • Que: वसंतोत्सव कधी साजरा केला जातो?

    Ans: सर्वसाधारणपणे माघ शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) पासून वसंतोत्सवाची सुरुवात होते आणि फाल्गुन पौर्णिमेला (होळी) तो उत्साहात संपतो. प्रदेशानुसार कालावधीत थोडाफार फरक आढळतो.

  • Que: वसंत पंचमीचे महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. तसेच काही परंपरांनुसार कामदेव (मदन) यांचा जन्मदिवस मानला जातो. ज्ञान, कला आणि प्रेम यांचा संगम दर्शवणारा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

Web Title: Vasantotsav 2026 what is the spring season know the tradition and significance behind celebrating this festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • dharm
  • Hindu Festival
  • Religion

संबंधित बातम्या

Rishi Panchami Wishes: श्रद्धा आणि भक्तीचा पवित्र सण ऋषीपंचमी! प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
1

Rishi Panchami Wishes: श्रद्धा आणि भक्तीचा पवित्र सण ऋषीपंचमी! प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय
3

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.