फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिना हा महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. यावेळी श्रावणामधील येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व आहे. त्याचसोबत श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रदोष व्रताला देखील महत्त्व आहे. यावेळी श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत बुधवार, 6 ऑगस्ट रोजी आहे. हे व्रत दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. त्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्तांनी उपवास करुन विधिवत पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होतात, असे म्हटले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी काही राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
पंचांगानुसार, प्रदोष व्रताची तिथी बुधवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजून 27 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार प्रदोष व्रत बुधवार 6 ऑगस्ट रोजी आहे. यावेळी बुधवार असल्याने ते बुध प्रदोष व्रत असेल.
प्रदोष व्रताची पूजा विशेषतः प्रदोष काळात केली जाते. पूजा करण्यापूर्वी स्वच्छ कपडे परिधान करुन घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यावे. त्यानंतर एका पाटावर किंवा चौरंगावर महादेवांची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. नंतर शिवलिंग ठेवून त्यावर पाणी, मध, दूध आणि दही याने अभिषेक करावा.
मेष राशीच्या लोकांना बुध प्रदोष व्रत शुभ राहील. यावेळी नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच तुम्ही एखाद्यासोबत भागीदारीमध्ये व्यवसायाची सुरुवात करु शकतात. मात्र या काळात आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका.
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध प्रदोष व्रत चांगले राहणार आहे. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. तसेच माध्यमांशी संबंधित असलेले लोक त्यांचे पूर्वीपेक्षा आता अधिक काम चांगले करण्याचा प्रयत्न करतील. तसेच या लोकांना मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी बुध प्रदोष व्रत खास राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. तसेच विद्यार्थ्यांना अपेक्षित यश देखील मिळेल.
प्रदोष व्रताचे व्रत करणे खूप फायदेशीर मानला जातो. बुधवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला बुध प्रदोष व्रत म्हटले जाते. यामुळे व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचसोबतच करिअर आणि व्यवसायामध्ये देखील अपेक्षित यश मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)