फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार, 31 जुलै रोजी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत संक्रमण करणार आहे. आज सर्व राशीच्या लोकांवर गुरु ग्रहाचे वर्चस्व राहील. बुध आणि सूर्य कर्क राशीत युती करत असल्याने आज बुधादित्य योग देखील तयार होईल. त्याचप्रमाणे चित्रा नक्षत्रामुळे साध्य योग देखील तयार होणार आहे. तसेच गुरु आणि शुक्र मिथुन राशीत एकत्र असल्याने गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. यासोबतच शुक्र ग्रह आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी आहे यालाच सीतला सप्तमी असे देखील म्हटले जाते. बुधादित्य योगामुळे आज काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. करिअरपासून व्यवसायापर्यंत सर्व लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस शुभ राहणार आहे. व्यवसायासाठी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जे लोक नवीन नोकरी शोधत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कामानिमित्त प्रवास करु शकता.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करुन घ्या. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. समाजामध्ये तुम्हाला सन्मान आणि आदर मिळेल. राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुम्हाला परदेशांशी संबंधित कामात लाभ मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना यश मिळू शकतो. एखाद्या योजनेत गुंतवणूक केली असल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, लॅब इत्यादी व्यवसायांशी संबंधित लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस खास असणार आहे. यावेळी तुमचे प्रलंबित सर्व कामे पूर्ण होतील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील त्याचा तुम्हाला फायदा होईल. सरकारी कामाशी संबंधित लोकांचे प्रलंबित काम आज पूर्ण होतील. तुम्हाला सरकार आणि प्रशासनाकडून भरपूर सहकार्य मिळू शकते. कुटुंबामध्ये अनुकूल वातावरण राहील. वैवाहिक जीवनात आनंदी राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवास करु शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)