फोटो सौजन्य- pinterest
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. यावेळी प्रदोष व्रत शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी आहे. हे प्रदोष व्रत येत असल्याने त्याला शुक्र प्रदोष व्रत असे म्हटले जाते. असे मानले जाते की, या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने भक्ताला विशेष फळ मिळते. त्यासोबतच तणावातून मुक्तता होते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते. या काळात महादेवांची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. तसेच शिवलिंगावर बेलपत्र देखील अर्पण केले जाते. त्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. दरम्यान, या दिवशी काही सोपे उपाय केल्याने तुम्हाला इच्छित परिणाम मिळू शकतात. तसेच रखडलेली कामे देखील लवकर पूर्ण होतात. प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करावे, जाणून घ्या
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी पहाटे 4.8 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 3.12 वाजता संपेल. यावेळी प्रदोष व्रत शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. शुक्रवार असल्याने त्याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाईल. यावेळी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.38 ते 8.55 पर्यंत राहील.
प्रदोष व्रताच्या दिवशी दुधात तीळ मिसळून त्याचा शिवलिंगावर अभिषेक करा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि संघर्षांपासून मुक्तता मिळते.
महादेवाची पूजा करताना शिवलिंगावर चंदन लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे ते प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांचे आशीर्वाद वर्षाव करतात. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाला चंदन अर्पण करावे. त्याच्या प्रभावामुळे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात.
प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाला शमीचे फूल अर्पण करावे. महादेवांना हे फूल खूप आवडते. यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप आणि गूळ अर्पण करावे. यामुळे महादेवाचे अपार आशीर्वाद आपल्यावर राहतात.
प्रदोष व्रत पाळल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर होतात. यामुळे व्यक्तीला पुत्र, धन आणि उत्तम आरोग्याचे आशीर्वाद मिळतात. शुक्र प्रदोष व्रत पाळल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी, सौभाग्य आणि संपत्ती मिळते. तसेच आर्थिक स्थिती देखील सुधारते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)