Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Premanand Maharaj : जर पत्नीने केला पतीरोबर डबल गेम तर ? प्रेमानंद महाराज नेमकं म्हणाले तरी काय ?

पती पत्नीच्या नात्यामध्ये नेहमी पुरुषच नाही तर काही वेळा महिला देखील खोटं वागतात किंवा पती मानसिक त्रास देतात. यावर प्रेमानंद महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 11, 2025 | 05:54 PM
Premanand Maharaj : जर पत्नीने केला पतीरोबर डबल गेम तर ? प्रेमानंद महाराज नेमकं म्हणाले तरी काय ?
Follow Us
Close
Follow Us:
  • जर पत्नीने केला पतीरोबर डबल गेम तर ?
  • प्रेमानंद महाराज नेमकं म्हणाले तरी काय ?
  • पती-पत्नीच्या नात्याबाबत प्रेमानंद महाराजांचा मोलाचा सल्ला
सोशल मीडियावरील रिल्सच्या माध्यमातून अनेक चांगले विषय देखील पाहायला मिळतात. सध्याचं हे धावपळीचं जग असून अनेकदा मानसिक ताण तणाव जास्त जाणवतो. या सगळ्यात काही सकारात्मक विचार रिल्समधून व्हायरल होत असतात. वृंदानमचे प्रेमानंद महाराज यांचे विचार रिल्समधून लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचतात. स्पर्धेच्या या युगात करियर, नातं आणि स्वप्नांसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र अनेकदा आपण चांगलं वागत असूनही जोडीदार आपल्याला फसवतो, आपल्याशी खोटं वागतो आणि या अशा कारणांनी जास्त ताण तणाव येतो. पती पत्नीच्या नात्यामध्ये नेहमी पुरुषच नाही तर काही वेळा महिला देखील खोटं वागतात किंवा पती मानसिक त्रास देतात. यावर प्रेमानंद महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

Astrology : घराच्या बाल्कनीत किंवा छतावर कबुतरांनी अंडी घालणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं? वाचा सविस्तर

प्रेमानंद महाराजांच्या बैठकीत एका भक्ताने महाराजांना प्रश्न केला की, जर पत्नी पतीचा मानसिक छळ करत असेल किंवा पती खोटं वागत असेल तर पतीने काय करावं ? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणतात की, कोणतंही नातं हे एका बाजूने कधीच नसतं. पती आणि पत्नीच्या नात्यात त्या दोघांची भूमिका फार महत्वाची असते. खरंतर कोणा एकामुळे नातं कधीच खराब होत नाही. जर पत्नी पतीशी चुकीचं वागत असेल किंवा खोटं बोलत असेल तर सरळ सरळ पत्नी चुकीची आहे असा अर्थ होत नाही. पत्नीच्या या वागण्यामागे नेमकं कारण काय किंवा ती अशी का वागते ? हे पतीने एकदा समजून घ्यायला हवं.

Kaal Bhairav Puja 2025: कालभैरवची पूजा केल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या

नातं हे दोघांचं असतं असंही असू शकतं की, पतीने पत्नीशी नातं सांभाळताना तिला प्रेम , आदर दिला नसेलं किंवा तिला कधी चुकीची वागणूक दिली असेल . हे आधी पतीने समजून घ्यायला हवं. आपल्या पत्नीशी आपण कधी चुकीचं वागलो का हे देखील लक्षात घेतलं तर पती पत्नीचं नातं सांभाळण्यात मदत होईल. प्रेमानंद महाराज पुढे असंही म्हणतात की, जेव्हा पत्नी पतीशी खोटं वागते तेव्हा पतीने मोकळेपणाने तिच्याशी संवाद साधणं महत्वाचं असतं. तिच्यावर खूप प्रेम केलं तिच्या विश्वास दिला तर कदाचित नातं तुटण्यापेक्षा ते आणखीच घट्ट होतं, असं उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिलं.

 

Web Title: Premanand maharaj what if the wife is lying to her husband premanand maharaj gave an answer to this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Premanand Maharaj
  • Relationship issues
  • religion news

संबंधित बातम्या

Premanand Maharaj: नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ? प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर
1

Premanand Maharaj: नोकरीवरुन काढलं तर बॉसला कर्माची शिक्षा मिळते ? प्रेमानंद महाराजांनी दिलं हटके उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.