Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Radha Ashtami 2026: राधाष्टमी कधी आहे? राधा-कृष्णाच्या प्रेमभक्तीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परंपरा जाणून घ्या

भाद्रपद शुक्ल अष्टमीला राधाष्टमी साजरी केली जाते. श्रीराधेच्या जन्मोत्सवाचा हा दिवस राधा-कृष्ण भक्तांसाठी विशेष मानला जातो. राधेला निःस्वार्थ प्रेम, समर्पण आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. यंदा शनिवार, १९ सप्टेंबर रोजी राधाष्टमी साजरी होणार असून, या दिवसाचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परंपरा जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 18, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • यंदा १९ सप्टेंबर २०२६ रोजी राधाष्टमी साजरी केली जाणार आहे
  • भाद्रपद शुक्ल अष्टमीला राधाष्टमीचा उत्सव साजरा केला जातो
  • या दिवशी राधा-कृष्णाची पूजा, नामस्मरण, भजन आणि कीर्तन करण्याची परंपरा आहे
 

 

 

यंदा राधाष्टमी शनिवार, १९ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. भाद्रपद शुक्ल अष्टमीला राधाष्टमी साजरी केली जाते. यंदा अष्टमी तिथीची सुरुवात १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शनिवार, १९ सप्टेंबर दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी समाप्त होत आहे.

राधाष्टमीची पूजा कशी केली जाते?

राधाष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील देव्हाऱ्यात श्रीराधा-कृष्णाची पूजा केली जाते. काही परंपरांमध्ये राधाराणीची विशेष पूजा मध्यान्हकाळात केली जाते. उपवास करण्याचीही प्रथा आहे; मात्र उपवासाची पद्धत कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकते. या दिवशी राधा-कृष्णाला फुले, फळे, मिठाई आणि नैवेद्य अर्पण करून आरती केली जाते. भक्त राधा-कृष्णाचे नामस्मरण आणि भजन-कीर्तन करतात.

Numberlogy: गौरी पूजनाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होईल करिअरमध्ये फायदा

राधाष्टमीचे महत्त्व

राधाष्टमी हा श्रीराधेच्या जन्मोत्सवाचा दिवस मानला जातो. राधा ही कृष्णावरील उत्कट प्रेम, समर्पण आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. वैष्णव परंपरेत राधा-कृष्णाची युगल उपासना विशेष महत्त्वाची आहे. राधेच्या भक्तीमध्ये कोणतीही अपेक्षा नसून कृष्णाशी असलेले तिचे नाते हे प्रेम आणि समर्पणाचे आदर्श रूप मानले जाते. त्यामुळे राधाष्टमीच्या दिवशी भक्त श्रीराधेचे स्मरण, पूजा, नामस्मरण आणि उपवास करतात.

राधा-कृष्ण भक्तीतील राधेचे स्थान

राधेला कृष्णाची सर्वाधिक प्रिय गोपी आणि आदर्श भक्तीचे प्रतीक म्हणून विविध वैष्णव परंपरांमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. मराठी विश्वकोशानुसार राधेच्या भक्तीपरंपरेच्या विकासात पुराणे आणि जयदेवाचे गीतगोविंद यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुढे राधा-कृष्णाच्या उपासनेला विविध वैष्णव संप्रदायांमध्ये विशेष स्थान मिळाले. राधा म्हणजे केवळ कृष्णाची प्रेयसी असे एकांगी स्वरूप नसून, कृष्णभक्तीतील प्रेम, विरह, समर्पण आणि भक्तिभावाचे प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

महाराष्ट्रातील राधाष्टमीच्या परंपरा

महाराष्ट्रात राधाष्टमीचा उत्सव वैष्णव आणि कृष्णभक्तीच्या परंपरेशी जोडलेला आहे. मंदिरांमध्ये राधा-कृष्णाची विशेष पूजा, अभिषेक, भजन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. काही कुटुंबांमध्ये घरी राधा-कृष्णाची पूजा करून उपवास केला जातो. नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन (ISKCON) मंदिरातही १९ सप्टेंबर रोजी राधाष्टमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेत कृष्णभक्तीला महत्त्वाचे स्थान असल्याने राधाष्टमी हा दिवस राधेच्या प्रेमभक्तीचे स्मरण करण्याचा आणि राधा-कृष्णाचे नामस्मरण करण्याचा दिवस मानला जातो.

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव

राधाष्टमीचा उत्सवाचा मुख्य उद्देश कोणता

राधाष्टमीचा उत्सव निःस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व अधोरेखित करतो. राधेचे कृष्णावरील प्रेम हे भक्तीचे आदर्श रूप मानले जाते. त्यामुळे या दिवशी केवळ विधी न करता मनापासून राधा-कृष्णाचे स्मरण करणे, भजन-कीर्तन करणे आणि भक्तीभाव जोपासणे याला विशेष महत्त्व दिले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Radha ashtami 2026 when is radhashtami importance and tradition of celebrating it in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: गौरी पूजनाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होईल करिअरमध्ये फायदा
1

Numberlogy: गौरी पूजनाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होईल करिअरमध्ये फायदा

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव
2

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव

Budh Uday: बुध उदयामुळे ‘या’ राशींच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या, अडचणी टाळण्यासाठी करा हे उपाय
3

Budh Uday: बुध उदयामुळे ‘या’ राशींच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या, अडचणी टाळण्यासाठी करा हे उपाय

Gauri Puja: कानाकोपऱ्यात गौरीचे रूप वेगळे, महाराष्ट्रातील गौरीपूजेच्या अनोख्या परंपरा जाणून घ्या
4

Gauri Puja: कानाकोपऱ्यात गौरीचे रूप वेगळे, महाराष्ट्रातील गौरीपूजेच्या अनोख्या परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.