फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 20 जुलै रोजी सकाळी 6.11 वाजता चंद्र वृषभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. यामुळे तो आधीच या राशीमध्ये उपस्थित असल्याने शुक्राशी युती करणार आहे. अशा घटना ज्योतिषशास्त्रामध्ये खूप शुभ मानल्या जातात. चंद्राला मन, भावना आणि शांतीचे प्रतीक मानले जाते तर शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. शुक्र ग्रहाची स्वतःची रास वृषभ आहे आणि चंद्र हा तेथे उच्च स्थानावर असल्याने या राशीमध्ये ग्रहांची युती होईल.
चंद्र आणि शुक्र यांच्या होणाऱ्या वृषभ राशीमध्ये राजलक्ष्मी योग तयार होत आहे. जो धन, समृद्धी आणि आनंदासाठी खूप चांगला मानला जातो. हा योग रविवार, 20 जुलै रोजी तयार होत असून तो अडीच दिवसांसाठी प्रभावी राहणार आहे. या योगामुळे धन, प्रेमात गोडवा, सर्जनशीलता आणि कौटुंबिक आनंद वाढेल. राजलक्ष्मी योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांच्या कुडंलीत चंद्र आणि शुक्राची युती पहिल्या घरात होत असल्याने या लोकांमध्ये आकर्षण आणि आत्मविश्वास वाढलेला राहील. तसेच त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वात सकारात्मक ऊर्जा वाढलेली राहील. त्यांच्या या युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी अशा गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो. तसेच एखाद्या योजनेत गुंतवणूक करणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ खूप शुभ मानला जातो. तसेच तुमचे नातेसंबंध मजबूत राहील.
कर्क राशीच्या लोकांच्या कुडंलीत चंद्र आणि शुक्राची युती अकराव्या घरात होत असल्याने या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचे ज्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते परत मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या भावडांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. तसेच या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये फायदा होईल. नेटवर्किंग क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होईल.
कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये ही युती नवव्या घरात होत असल्याने आध्यात्मिक प्रगतीसाठी ही युती चांगली मानली जाते. त्यामुळे या राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. शिक्षणात यश देखील मिळेल. कुटुंबासोबत वेळ चांगला घालवाल. आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.
तूळ राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये ही युती आठव्या घरात होत असल्याने या लोकांना अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. तसेच गुंतवणूक करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ होऊ शकतात. तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
मकर राशीच्या कुंडलीमध्ये ही युती पाचव्या घरात होत असल्याने या लोकांची प्रत्येक कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच या लोकांच्या नातेसंबंधामध्ये गोडवा राहू शकतो. जे लोक एखाद्या योजनेत गुंतवणूक करत आहे अशा लोकांना फायदा होईल. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)