
फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस सामान्य राहील. अंक 7 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह केतू आहे. आज बुधवार असल्याने आजचा दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे आणि त्याचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहील. ज्योतिषशास्त्रानुसार बुधचा अंक 5 आहे. मूलांक 5 असणाऱ्या लोकांनी सावध राहावे. तर मूलांक 7 असलेल्यांचे नातेसंबंध चांगले राहतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. संयम बाळगणे गरजेचे आहे.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. अनावश्यक गोष्टीकडे लक्ष देणे टाळावे. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. नाहीतर तुम्हाला नुकसान होईल. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखू शकता.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामात समस्या येऊ शकतात. त्यामुळे कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. मानसिक ताण वाढू शकतो. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कोणावर जास्त विश्वास ठेवल्यास समस्या येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. कोणतेही निर्णय शांततेने घ्या. नातेसंबध चांगले राहतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुलांच्या बाबतीत चिंता वाटू शकते. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहील.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. घरातील काम वाढू शकते त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढू शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)