Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha bandhan: सोने, चांदी किंवा रेशीम भावाला कोणत्या प्रकारची राखी बांधल्यास होते प्रगती

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी सोने, चांदी, रेशम कोणत्या प्रकारची राखी बांधावी. जाणून घ्या कोणत्या प्रकारची राखी बांधणे असते फायदेशीर

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 03, 2025 | 11:46 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणींच्या अतूट प्रेमाचा सण आहे. बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी भाऊ देखील त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. यंदा हा सण शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. राखी बांधताना या धाग्याच्या साहित्याला देखील विशेष महत्त्व आहे. भावाला कोणत्या प्रकारची राखी बांधणे असते फायदेशीर, जाणून घ्या

कधी आहे रक्षाबंधन

श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता सुरु होणार आहे. या तिथीची समाप्ती शनिवार 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजता होईल. अशावेळी रक्षाबंधनाचा सण शनिवार 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.

Astrology: शरीराच्या भागांवर तीळ असणारे लोक असतात भाग्यवान, या लोकांना मिळते सुख संपत्ती

रेशीम की कापूस कोणत्या धाग्याची बांधावी राखी

असे म्हटले जाते की, रक्षाबंधनासाठी सर्वात पारंपरिक आणि सामान्य धागा म्हणजे रेशीम किंवा कापूस यांच्या धाग्याच्या राखीला अत्यंत शुभ मानले जाते. कारण याला पवित्रता, कोमलता आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. रेशमी राख्या या मऊ असतात त्यामुळे नात्यातील नाजूकपणा आणि ताकद दोन्ही दर्शवतात. तर कापूस किंवा रेशमी धाग्याती राखी घातल्याने भावाकडून संरक्षणाचा आशीर्वाद मिळतो, असे म्हटले जाते.

चांदीची राखी बांधणे शुभ की अशुभ

धार्मिक मान्यतेनुसार, चांदीचा संबंध चंद्राशी असल्याचे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र दोष असतो त्यांच्या बहिणींनी चांदीची राखी बांधल्यास या दोषापासून त्यांची सुटका होऊ शकते. यामुळे चांदीची राखी बांधणे शुभ मानले जाते. चांदीला शीतलता आणि मानसिक शांतीचे प्रतीक मानले जाते. हे भावाला मानसिकदृष्ट्या सांत्वन देते.

Vastu Tips For Rakhi: राखी बांधताना कोणत्या दिशेला बसणे योग्य, जाणून घ्या नियम

सोन्याची राखी बांधणे शुभ की अशुभ

मान्यतेनुसार, सोन्याला संपत्ती, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. यावेळी बहिणी भावाला सोन्याच्या राख्या बांधतात. सोन्याची राखी फक्त बहिणीला तिच्या भावाबद्दल असलेले प्रेम दर्शवत नाही तर त्याच्या प्रगती आणि समृद्धी देखील दर्शवते. म्हणूनच शास्त्रांमध्ये सोन्याची राखी बांधणे शुभ मानले जाते.

राखी बांधण्यामागील भावना असते महत्त्वाची

राखीची खरी शक्ती त्याच्या धाग्यातून किंवा धातूतून येत नाही, तर ती ज्या भावनेने बांधली जाते त्यातून येते. ती राखी रेशमी असो, चांदी असो किंवा सोन्याची ती खऱ्या मनाने बांधली गेली असेल आणि भावाप्रती प्रेम आणि संरक्षणाची भावना असेल तर ती राखी सर्वात शुभ आणि फलदायी असते. प्रत्येक बहीण तिच्या क्षमतेनुसार तिच्या भावासाठी राखी निवडते आणि ही भावना या सणाचे सर्वात मोठे सौंदर्य असते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Raksha bandhan 2025 when and which rakhi gold silver silk or cotton sisters benefit brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • dharm
  • Raksha Bandhan
  • religions

संबंधित बातम्या

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
1

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष
4

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.