फोटो सौजन्य- istock
आज 3 ऑगस्ट रोजी चंद्र दिवसरात्र वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करणार आहे. आजचा रविवारचा दिवस असल्याने सर्व राशीच्या लोकांवर सूर्य देवाचे वर्चस्व राहील. त्याचसोबत आज रवी योग देखील तयार होत आहे. आज चंद्र अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्रामध्ये राहील. त्यामुळे शुक्ल आणि ब्रह्म योग देखील तयार होणार आहेत. रवि योग आणि सूर्य देवाच्या कृपेमुळे आज सिंह राशीसह या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तसेच या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. पैसे कमविण्याच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबात सुख-समृद्धी येईल. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहेत, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस शुभ असणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज फायदा होईल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तसेच तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
सिंह राशीच्या लोकांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली सर्व कामे आज पूर्ण होतील. रिअल इस्टेट, वाहतूक, मालमत्ता इत्यादींशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो. तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल. नातेवाईक आणि मित्रांकडून तुम्हाला अनपेक्षित मदत मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तूळ राशीच्या लोकांना कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. क्लब, रेस्टॉरंट इत्यादींमध्ये चांगली कमाई होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस खूप खास राहणार आहे. तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्हाला बाजारात अडकलेले तुमचे पैसे परत मिळू शकतात. ज्यामुळे तुम्ही आनंदात राहू शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप खास दिवस असणार आहे. या लोकांना व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. तुमचे प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. एखादा प्रलंबित व्यवहार अनपेक्षितपणे पूर्ण होऊ शकतो जो तुम्हाला दिलासा आणि आनंद देईल. सरकारी कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळी तुम्ही आज जाऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)