फोटो सौजन्य- istock
आज रविवार, 3 ऑगस्टचा दिवस. आजचा दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्याचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर होताना दिसून येईल. मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस आर्थिक बाबतीत चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. मूलांक 3 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात पैसे अडकले असतील तर ते परत मिळतील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस जास्त चांगला राहणार नाही. आर्थिक गोष्टीमुळे तुम्ही थोडे तणावात रहाल. व्यवसायात नुकसान होऊ शकते. यावेळी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात.
मूलांक 3 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि नियोजित केलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्ही काही पैसे धार्मिक ठिकाणी दान करू शकता त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. जर तुम्ही नवी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.
मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा सामान्य राहील. आज तुम्हाला प्रत्येक कामात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा.
मूलांक 5 असलेल्या लोकांना आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखाव्या लागतील.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही विचार केलेली सर्व कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस जास्त चांगला राहणार नाही. कामाच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणाव वाढू शकतो. कुटुंबासाठी आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कुटुंबाला वेळ द्याल. तसेच कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन करू शकता. व्यवसायात तुम्हाला फायदा होऊ शकतो. धार्मिक कार्यात तुम्हाला आवड निर्माण होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)