फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 12 ऑक्टोबरचा दिवस. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आज चंद्र मिथुन राशीमध्ये राहून गुरुसोबत गजकेसरी राजयोग तयार करेल. तसेच चंद्रापासून चौथ्या घरामध्ये सूर्य आणि शुक्र यांची युती होईल. त्याबरोबरच मृगशिरा नक्षत्रामध्ये रवियोग आणि वारण योग देखील तयार होईल तो देखील फायदेशीर ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि कुंभ या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि कौटुंबिक जीवन चांगले राहील. रवि योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला आज नशिबाची साथ मिळेल. विद्युत उपकरणे आणि वाहने वापरणाऱ्यांना आज फायदा होईल. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी काही गुंतवणूक करू शकता. जवळच्या नातेवाईकाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीला किंवा खरेदीला जाऊ शकता. दीर्घकालीन केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. कोणतीही अपूर्ण कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करू शकाल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. मित्र आणि जवळच्या नातेवाईकांसोबत तुम्ही वेळ घालवाल. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. करिअर आणि कामाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. व्यावसायिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत. तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून फायदा होईल. जर तुम्ही नवीन काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल. यावेळी तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. भूतकाळात केलेल्या कोणत्याही कामाचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या मुलांशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवल्या जातील. तुम्ही एखाद्या शुभ कार्याचे घरामध्ये आयोजन करु शकता. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जवळच्या नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे येऊ शकतात त्यांच्याकडून तुम्हाला काही महत्त्वाची माहिती समजू शकते. हॉटेल आणि केटरिंगशी संबंधित कामात नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही सहलीला जाऊ शकता. तुम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खूप फायदा होईल. नशीब तुम्हाला मालमत्तेशी संबंधित कामात यश देईल. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकीत पैसे देखील गुंतवू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)