फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, कला, भौतिक सुखसोयी आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी शुक्र ग्रह एका विशिष्ट कालावधीमध्ये आपले नक्षत्र बदलत राहतो ज्याचा काही राशीच्या लोकांवर परिणाम होताना दिसून येतो. पंचांगानुसार, शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.55 वाजता शुक्र उत्तराफाल्गुनी सोडून हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार, 17 ऑक्टोबर रोजी हस्त नक्षत्रात शुक्राचे होणारे संक्रमण या राशीच्या लोकांमध्ये नातेसंबंध आणि सुखसोयींमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणताना दिसून येतील. या राशीच्या लोकांमध्ये भौतिक सुखसोयींची कमतरता राहणार नाही. शुक्र हस्त नक्षत्रातील संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाचे अधिपत्य असल्याने या संक्रमणाचा तुमच्यावर अधिक प्रभाव असलेला दिसून येईल. हे संक्रमण तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा घेऊन येणारा राहणार आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. कोणाशीही सततचे मतभेद संपतील. या काळात वैवाहिक जीवन चांगले राहील. नवीन गाडी, घराची सजावट इत्यादी वस्तूंची खरेदी करु शकता. कला, फॅशन किंवा डिझाइनशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर मानला जातो. या काळात तुम्हाला सामाजिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
शुक्र ग्रहाची रास शुक्र मानली जाते. शुक्र राशीच्या संक्रमणाचा परिणाम तूळ राशीच्या लोकांवर होताना जाणवू शकतो. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. यावेळी तुम्ही तुमच्या नात्यांबद्दल पूर्वीपेक्षा अधिक गंभीर आणि समजूतदार व्हाल. अविवाहित लोकांसाठी, लग्नाच्या प्रस्तावांसाठी हा एक शुभ काळ आहे. याशिवाय तुम्ही नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा महागड्या वस्तू यांची खरेदी करु शकता.
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे संक्रमण हे खूप फायदेशीर असणार आहे. या संक्रमणाचा संबंध सौंदर्य आणि आरामाकडे असेल. तुम्ही तुमचे घर आणि कुटुंब सजवण्यात रस घ्याल आणि तुमच्या घरगुती जीवनात शांती आणि आनंद अनुभवाल. पती-पत्नीमधील नात्यात नवीनता येईल त्यामुळे तुम्हाला या काळात अपेक्षित यश मिळेल. या काळात नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित फायदा होईल. ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. कला, संगीत किंवा सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)