Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Darshan of Kuladevata: वर्षातून एकदा कुलदेवतेचे दर्शन घेण्यामागे काय आहे धार्मिक परंपरा

अनेकजण वर्षांतून एकदातरी आपल्या कुलदैवतेची, कुलस्वामिनीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. हे दर्शन का घ्यावे? हे दर्शन का फलदायी असते. ज्यांना आपली कुलदेवता किंवा कुलस्वामिनी माहिती नसेल तर शोध घेणे का गरजेचे आहे? जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 03, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वर्षातून एकदा कुलदेवतेचे दर्शन घेण्यामागे काय आहे कारण
  • वर्षातून एकदा कुलदेवतेचे दर्शन घेण्यामागील धार्मिक परंपरा
  • कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ काय
 

 

वर्षातून एकदा कुलस्वामिनीचे (कुलदेवी) दर्शन घेणे हे कुळाचे रक्षण, उन्नती आणि पूर्वजांचे आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कुलदेवी आपल्या वंशाची अधिष्ठात्री देवता असल्याने वर्षातून एकदा तिच्या दरबारी जाऊन दर्शन घेतल्याने कुटुंबावर तिची कृपा राहते, संरक्षण मिळते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन कुळाचा उद्धार होतो असे मानले जाते. वर्षातून एकदा कुलस्वामिनीचे दर्शन घेण्यामागील काय रचना आपल्या ऋषीमुनींनी केली, जाणून घ्या

कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ

‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून ‘कुलदेवता’ हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हटलंय.

कुलदेवता ज्यावेळी पुरुषदेवता असते, त्यावेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.

Sankashti Chaturthi 2026: एकदंत संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

आपला कुलदेवता कोण असतात?

कुलदेवत हे आपल्या कुळाचे आणि वंशाचे संरक्षण करणारे देवत असतात. बहुतेक करून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध देवत हे प्रामुख्याने, त्यांचे ‘कुलदेवत’ असतात. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदेवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं असं म्हटलं जातं.

कुल संरक्षण आणि आशीर्वाद

कुलदेवी आपल्या कुळाची रक्षणकर्ता असते. दर्शनामुळे कुटुंबावर येणारी संकटे टळतात अशीच अनेक श्रद्धाळूंची धारणा असते. तसेच देवीचा भक्कम आशीर्वाद पाठीशी राहतो. त्यामुळे आपली उन्नती होते.‌

पूर्वजांशी नाते जोडले जाते..

प्रत्येक कुळाचे पूर्वज ज्या दैवताची आराधना करत आले आहेत, ते कुलदैवत असते. दरवर्षी दर्शनाला जाऊन आपण त्या परंपरा आणि मूळ शक्तीशी जोडलेले राहतो. आपल्या आपल्या मूळ ठिकाणी त्यामुळे किमान एकदिवसीय तरी जाणे होते. आपल्या कुलदेवतेसोबतच आपल्या आप्तेष्टजणांचीही त्यामुळे भेट होते.

कुलधर्म-कुलाचार

विवाह, मुंज किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुलदेवतेला बोलावणे (आमंत्रण), नैवेद्य दाखवणे आणि कुलाचार करणे अनिवार्य असते. यामुळे कुळाची प्रगती होते. तसेच कुलदेवीची उपासना किंवा दर्शनामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरातील सदस्यांची आध्यात्मिक आणि भौतिक उन्नती होते.

अनेकांची कुलदैवत साडेतीन शक्तीपीठे

महाराष्ट्रात अनेक जण तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका किंवा सप्तशृंगी माता यांना कुलस्वामिनी मानतात. या ठिकाणी जाऊन दर्शन घेणे हे आत्मिक शांतीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे याठिकाणी वर्षभर भाविक जात असतात. आपल्या परिवारासह तेथे गेल्याने पारिवारिक आनंदही प्राप्त होतो.

आपली कुलदेवता माहिती नसेल तर

जर कुलस्वामिनी कोणती हे माहीत नसेल, तर घरातील मोठ्या मंडळींना विचारून किंवा कुलाचारावरून ती शोधून काढावी. अनेकांना जर माहिती नसेल तर आपल्या परिवाराचा इतिहास, कुंडली किंवा अन्य मार्गाने शोधून कुलदैवतेचा शोध घ्यावा आणि नित्यनियमाने वर्षातून एकदा तरी तिच्या स्थानी दर्शन घ्यावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुलदेवता म्हणजे काय?

    Ans: कुलदेवता म्हणजे आपल्या कुटुंबाची किंवा वंशाची मुख्य देवता. ही देवता पिढ्यान्‌पिढ्या पूजली जाते आणि कुटुंबाचे रक्षण करते असे मानले जाते.

  • Que: वर्षातून एकदा कुलदेवतेचे दर्शन का घ्यावे?

    Ans: परंपरेनुसार वर्षातून किमान एकदा कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने देवतेचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबावर कृपा राहते.

  • Que: या परंपरेमागे धार्मिक कारण काय आहे?

    Ans: धर्मशास्त्रानुसार कुलदेवता ही आपल्या वंशाची रक्षक मानली जाते. तिच्या पूजेमुळे पितृऋण कमी होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात.

Web Title: Religious tradition behind visiting the ancestral deity once a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.